नीरज, हीमा प्रतिष्ठित कॉन्टिनेंटल कपसाठी पात्र  

नवी दिल्ली : स्टार भालाफेकीपटू नीरज आणि इतिहास रचणारी धावपटू हीमा दास यांच्यासह ७ भारतीय खेळाडू इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनच्या (आयएएएफ) प्रतिष्ठित कॉन्टिनेंटल कपमध्ये सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा चेक प्रजासत्ताकच्या ऑस्ट्रवा येथे ८-९ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
आशियाई अॅथलेटिक्स असोसिएशन (एएए) यांनी ७ भारतीय खेळाडूंची निवड केली आहे जे आशिया पॅसिफिक संघाचे नेत्रुत्व  इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनच्या कॉन्टिनेंटल कपमध्ये करतील. या स्पर्धेत आपल्या खंडीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्पर्धा होत असते.
सध्याचा मानांकनाचा विचार केला तर नीरज चोप्रा (भालाफेक) , महम्मद अनास (४०० मी.), जिन्सन जॉन्सन (८००मी),आणि अमरिंदर सिंग (ट्रिपल जंप) यांचा पुरुषांच्या यादीत समावेश आहे तर महिलांमध्ये हीमा दास (४००मी), पी यु चित्रा (१५००मी), आणि सुधा सिंग (३००० मी स्टिपलचेस)यांनी स्थान मिळवले आहे.
आशियाई अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव एम. आर. निकोलस म्हणाले,” या  उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंची निवड त्यांच्या आयएएएफच्या मानांकनानुसार आणि आमच्या गणितीतज्ञाच्या आकडेवारीवरून केली आहे. आम्हाला माहिती आहे की सामन्यांचे निकाल पुढील काही दिवसात सतत बदलत जाणार आहेत. या खेळाडूंपेक्षा कोणी जास्त चांगली कामगिरी केली तर त्यांच्या जागी त्या अन्य खेळाडूंची निवड केली जाऊ शकते. परंतु असे होऊ नये अशी अशा आहे.”
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनच्या (आयएएएफ) कॉन्टिनेंटल कप स्पर्धेची सुरुवात २०१०मध्ये झाली होती. तेव्हापासून ही स्पर्धा दार चार वर्षांनी होते. आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि एशियन पॅसिफिक या चार संघाचे सर्वोत्तम खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)