नीरज जोर्वेकर, वैष्णवी सिंग, अमन शहा यांचा उपान्त्य फेरीत प्रवेश

आयकॉन ग्रुप लिटल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा

पुणे – नीरज जोर्वेकर, वैष्णवी सिंग, अमन शहा व तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्‍का देताना चौथ्या आयकॉन ग्रुप लिटल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. पीएमडीटीए यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पाषाण येथील आरपीटीए टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील 8 वर्षांखालील मिश्र गटाच्या उपान्त्यपूर्व फेरीत नीरज जोर्वेकर याने सातव्या मानांकित अमीन क्षितिजचा 5-1 असा सनसनाटी पराभव केला. याच गटातील अन्य लढतींमध्ये अव्वल मानांकित नमिश हूडने विहान पटनीला 5-1 असे पराभूत केले. तर दुसऱ्या मानांकित आर्यन कीर्तनेने पाचव्या मानांकित सुजय देशमुखचा 5-1 असा पराभव करून उपान्त्य फेरी गाठली.

दहा वर्षांखालील मुलींच्या गटात बिगरमानांकित वैष्णवी सिंगने अव्वल मानांकित मेहक कपूरचा 5-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. या विजयामुळे वैष्णवीने उपान्त्य फेरीत धडक मारली. याच गटातील अन्य लढतींमध्ये चौथ्या मानांकित रित्सा कोंडकरने प्रेक्षा प्रांजलचा 5-2 असा, तर काव्या देशमुखने काम्या चोपडाचा 5-0 असा सहज पराभव केला. तसेच दुसऱ्या मानांकित प्रिशा शिंदेने जास्मिन कटारियाला 5-1 असे नमवीत आगेकूच केली.

दहा वर्षांखालील मुलांच्या गटात तेज ओक याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित कार्तिक शेवाळेचा 5-1 असा पराभव करून उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच अमन शहाने चौथ्या मानांकित पृथ्वीराज हिरेमठचा 5-3 असा पराभव करून उपान्त्य फेरीत आगेकूच केली.

सविस्तर निकाल –

आठ वर्षांखालील मिश्र गट – उपान्त्यपूर्व फेरी – नमिश हूड (1) वि.वि. विहान पटनी 5-1; रित्सा कोंडकर (4) वि.वि. आदित्य योगी 5-1; नीरज जोर्वेकर वि.वि. अमीन क्षितिज (7) 5-1; आर्यन कीर्तने (2) वि.वि. सुजय देशमुख (5) 5-1;

दहा वर्षांखालील मुली- उपान्त्यपूर्व फेरी – वैष्णवी सिंग वि.वि. मेहक कपूर (1) 5-2; रित्सा कोंडकर (4) वि.वि. प्रेक्षा प्रांजल 5-2; काव्या देशमुख वि.वि.काम्या चोपडा 5-0; प्रिशा शिंदे (2) वि.वि. जास्मिन कटारिया 5-1;
दहा वर्षांखालील मुले- उपान्त्यपूर्व फेरी – सक्षम भन्साळी (1) वि.वि. नमिश हूड (7)5-3; अवनीश चाफळे (3) वि.वि. शिवांश कुमार 5-2; अमन शहा वि.वि. पृथ्वीराज हिरेमठ (4) 5-3; तेज ओक वि.वि. कार्तिक शेवाळे (6) 5-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)