निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांची भटकंती

  • मावळात विविध धबधब्यावर पर्यटकांची वर्षाविहारासाठी गर्दी

कार्ला – निसर्गाचे देणे लाभलेला व हिरवाईने नटलेला व पावसाचे माहेरघर असलेला परिसर म्हणजे मावळ व मावळातील लोणावळा, खंडाळा, आंदर मावळ, पवन मावळसह, नाणे मावळातील कार्ला, भाजे, पाटण संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून, पर्यटकांची पसंती या भागाला दिसत असल्याने पर्यटक या भागात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

मावळ तालुक्‍यातील ग्रामीण भागत पर्यटकांचा ओढा वाढला असून, कार्ला एकवीरादेवी मंदिर, भाजे येथील धबधबे, पाटण येथील धबधबा व किल्ले लोहगड, विसापूर किल्ल्यावर भटकंती करण्याची पर्यटकांची संख्या वाढत आहे. या निसर्गाच्या सानिध्यात वर्षाविहाराचा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहे. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)