निवांत अंध मुक्‍त विद्यालयाचे “डोळस’ यश

– सलग बावीसाव्या वर्षीही शंभर टक्‍के निकाल

पुणे, दि.30 – निवांत अंध मुक्‍त विकासालयाचा निकाल सलग बावीसाव्या वर्षीही शंभर टक्‍के लागला असल्याने मुक्‍त विद्यालयात सध्या आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. येथील केदार क्षीरसागर हा विद्यार्थी 80.15 टक्‍के गुण मिळवत शाळेत प्रथम आला आहे. तर रुक्‍मिणी रजपूत ही विद्यार्थिनी 77.23 टक्‍के गुण मिळवत दुसरी व पूजा भोंबे हिने 76.31 टक्‍के गुण मिळवत शाळेत तिसरा येण्याचा मान मिळवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवांत अंध मुक्‍त विकासलयाच्या संस्थापिका डॉ. मीरा बडवे यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, राज्यातील 20 महाविद्यालयांतील 70 हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेने ब्रेल लिपीत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिल्याचा फायदा झाला आहे. निवांत ही संस्था 1996 पासून अंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काम करत असून गेल्या 22 वर्षांत सलग संस्थेचा निकाल 100 टक्‍के लागत आहे. आमच्या या विकासालयातील विद्यार्थी आज 800 पासून ते 80 हजार रुपयांपर्यंत पगार घेत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आजवर संस्थेतून अडीच हजार विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)