निवडणूक हारूनही पद न सोडण्याचा मालदीवचे राष्ट्रपती गयूम यांचा निर्णय

माले (मालदीव) – मालदीवचे राष्ट्रपती यामीन अब्दुल गयूम यांनी निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपली हार मान्य केली असली, तरी राष्ट्रपतीपद न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपली राष्ट्रपतीपदाची मुदत 17 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असल्याने तोपर्यंत राष्ट्रपतीपद आपण सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील 50 दिवस सत्ता हाती असल्याने गयूम आपले व्यापारी कराराशी संबंधित दस्तावेज लपवून आपल्या विरोधात जाणारे पुरावे नष्ट करू शकतात असा जाणकारांचा अंदाज आहे. राजकीय नेत्यांना कैद करण्याबाबतचा विरोध दडपून टाकण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पण या वेळी आपण शांतिपूर्ण मार्गाने सत्तांतर केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या अनपेक्षित विजयामुळे सर्वच चकित झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रपती गयूम यांनी आपण निवडून येण्यासाठी गडबड केल्याचा निवडणूक पर्यवेक्षकांचा आरोप होता. सरकारने एमडीपीचे सर्व वरिष्ठ नेते एकतर तुरुंगात डांबले होते वा त्यांना निर्वासित केले होते. त्यानंतर सोलिह यांना उमेदवारी देण्यात आली होती. देशातील जनतेला काय पाहिजे ते समोर आले असून आपण त्याचा स्वीकार करत आहोत असे गयूम यांनी सांगितले.

निवडणुकीचा अधिकृत निकाल शनिवारी घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान देण्यासाठी सर्व पक्ष आणि उमेदवार यांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)