निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकावर गुन्हा दाखल

मंचर – निवडणूक कामकाजाचे आदेश देऊनही मुद्दाम हेतुपुरस्पर निवडणूक कामात हलगर्जीपणा केला व कर्तव्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली म्हणून मांडवगण फराटा येथील शिक्षक दिलीप मारूती बोत्रे यांच्यावर मंडल अधिकारी एस. एम. पवार यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या शिक्षकाची केंद्राध्यक्ष म्हणून चांडोलीच्या मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती. आज (दि. 28) मतदान साहित्य ताब्यात घेण्यासाठी सकाळी 7 वाजता घोडेगाव येथे त्यांना बोलवण्यात आले होते; परंतु हे शिक्षक दुपारी 12.45 वाजता घोडेगाव येथे पोहचले. या शिक्षकाला अनेकजण सतत फोन लावत होते; परंतु त्यांनी कोणचाच फोन उचचला नाही. कर्तव्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील व तहसीलदार सुषमा पैकेकरी यांच्या आदेशाने मंडल अधिकारी एस. एम. पवार यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीचे काम टाळण्यासाठी काही कर्मचारी मुद्दाम उशीरा येतात, फोन बंद करून ठेवतात. उशीरा आल्यानंतर आपल्या जाग्यावर इतर कोणीतरी पाठवला जातो व आपले काम टळते म्हणून अशा युक्‍त्या कर्मचारी लढवतात. अशा लोकांना चाप बसावा म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.