निवडणूक आयोगाच्या निष्काळजीवर हायकोर्ट नाराज 

आयोगाला गांभीर्य समजत नसेल तर वॉरंट बजावूनही समजू शकतो

मुंबई – निवडणूकीच्या काळात मतदानाला दोन दिवस असताना अन्य प्रचार रोखला जातो त्याप्रमाणे सोशल मिडीयावरील प्रचार रोखा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीवेळी आयोगाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही जर आयोगाचे अधिकारी आणि वकील बेजबादरपणे गैरहजर राहणार असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यांना गांभीर्य समजत नसेल तर आम्ही ती वॉरंट बजावून समजावून शकतो, अशा शब्दांत खंडपीठाने संताप व्यक्त केला.

यासंदर्भात ऍड. सागर सुर्यवंशी यांच्या वतीने ऍड. अभिनव चंद्रचुड यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागिल सुनावणीच्यावेळी देशात पारदर्शक निवडणुका पार पाडणं ही राष्ट्रीय निवडणूक आयोगाची संविधानिक जबाबदारी आहे. ती झटकून चालणार नाही, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाचे कान उपटत आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात काही ठोस पावलं उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच आयोगाच्या अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीच्यावेळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आज सुनावणीच्यावेळी आयोगाचे अधिकारी आणि त्यांचे वकील गैरहजर राहिल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला. अधिकारी गैरहजर का राहिले याचे स्पष्ट करण द्या, असे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब ठेवली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)