निवडणूकीपूर्वी भारताशी चर्चा करणे निरर्थक ; पाकिस्तानच्या मंत्र्याचे स्पष्टिकरण

दुबई: भारतामध्ये होणाऱ्या निवडणूकांचे निकाल लागेपर्यंत भारताबरोबर शांतता चर्चा करणे निरर्थक आहे. भारतातील सध्याच्या सरकारकडून याबाबत कोणताही मोठा निर्णय अपेक्षित केला जाऊ शकत नाही, असे पाकिस्तानच्या एका वरिष्ठ मंत्र्याने म्हटले आहे. भारतातील नेते निवडणूकांची पूर्वतयारी करत आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांदरम्यान शांतता चर्चा होण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही, असे पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.

काही स्थैर्य निर्माण झाल्याशिवाय चर्चा निरर्थक आहे. भारतामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच शांतता चर्चेबाबत विचार केला जाईल. सध्याच्या सरकारकडून मोठ्या निर्णयाची अपेक्षा नसल्यानेच पाकिस्तानने चर्चेसाठी विलंब केला आहे. भारतात निवडून आलेल्या कोणत्याही पक्षाचा आणि नेत्याचा पाकिस्तानकडून आदरच केला जाईल. मात्र नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यापैकी कोणताही नेता निवडून आला तरी पाकिस्तानला काहीही फरक पडत नाही, असे चौधरी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी 2016 मध्ये केलेले हल्ले आणि त्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या “सर्जिकल स्ट्राईक’ नंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी सुरु राहू शकत नाही, असे भारताचे पहिल्यापासूनचे म्हणणे आहे.


इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून बदल…

गेल्यावर्षी करतारपूर कोरिडोर सुरु करण्याने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदतच झाली आहे. कारण या कोरिडोरचा फायदा केवळ शिख भाविकांसह दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास होणार आहे. पाकिस्तानमधील पूर्वीचे सरकार आणि लष्करामध्ये संघर्षाची स्थिती होती. मात्र इम्रान खान यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून निर्णयाचे केंद्र लष्कर राहिले नाही, तर पंतप्रधान इम्रान खान बनले आहेत, असेही फवाद चौधरी यांनी सांगितले.


2008 आसाम बॉंबस्फोट प्रकरणात 15 दोषी

गुवाहाटी (आसाम), दि. 28- सन 2008 मध्ये आसाममध्ये झालेल्या बॉंबस्फोट मालिका प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात 15 जणांना दोषी ठरवण्यात आले असून दोषींमध्ये एनडीएफबीचा (नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड) प्रमुख रंजन दैमारी याचाही समावेश आहे. 2008 साली झालेल्या या बॉंबस्फोट मालिकेत 88 लोक मारले गेले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश चक्रवर्ती यांनी रंजन दैमारी आणि अन्य 14 जणांना आयपीसीच्या विविध कलमांखाली दोषी जाहीर केले आहे. या 14 जणांमध्ये जॉर्ज बोडो, बी थरई, राजू सरकार, नीलिम दैमारी, अंचाई बोडो, इंद्र ब्रह्मा, लोको वासुमतारी, खड्‌गेशवर बासुमतारी, मृदुल गोयारी, माथुराम ब्रह्मा, आणि राजेश गोयारी यांचा समावेश आहे. 30 ऑक्‍टोबर 2008 रोजी गुवाहाटी, कोकराझार, बोंगई गाव आणि बारपेटा येथे बॉंबस्फोट घडवून आणले होते. या बॉंबस्फोटात 88 जण ठार झाले होते आणि 500 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)