निवडणुकीच्या राजकारणामुळेच पाकशी बोलण्यास भारत राजी नाही

पाकिस्तानी विदेश मंत्र्यांचा दावा
न्युयॉर्क – अंतर्गत राजकीय स्थिती आणि निवडणुकीच्या राजकारणाची अपरिहार्यता या कारणामुळेच पाकिस्तानशी चर्चा करण्यास भारत तयार होताना दिसत नाही असे प्रतिपादन पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी केले आहे. सध्या संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेच्या निमीत्ताने भारत आणि पाकिस्तानचे विदेश मंत्री न्युयॉर्क येथे आले आहेत. या दरम्यान दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांमध्ये चर्चा होणार होती. त्यासाठी भारताने सुरूवातीला तयारीही दर्शवली होती पण त्यांनी अगदी अखेरच्या क्षणी ही भेट रद्द केली त्या पार्श्‍वभूमीवर कुरेशी यांनी हे प्रतिपादन केले.

केवळ अंतर्गत राजकारण आणि निवडणुका यामुळेच भारत बोलण्यास तयार नाहीं असे कुरेशी म्हणाले. ते निवडणुकांना घाबरतात. त्यांनीच लंबक इतका ताणला आहे की आता त्यांना पुन्हा पहिल्या स्थितीत येण्यास जड जात आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर आपण पाकिस्तानशी चर्चा केली की आपल्यावरच बुमरॅंग उलटू शकते अशी त्यांना भिती वाटत असते असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या परिषदेच्या निमीत्ताने सार्कचीही बैठक झाली पण त्या बैठकीत पाकिस्तानी विदेश मंत्र्यांशी गाठ पडायला नको म्हणून सुषमा स्वराज बैठकीतून लवकर बाहेर पडल्या. त्यावर प्रतिक्रीया देताना कुरेशी म्हणाले की मला वाटले की त्या बैठकीत आम्ही निदान एकमेकांकडे पाहून स्मित तरी करू शकलो असतो. पण सुषमा स्वराज यांच्या चेहेऱ्यावर मला कमालीचा तणाव दिसला. आणि जेव्हा त्या निघून गेल्या त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही टाळले. त्यांच्यावर असलेले राजकीय दडपण मला त्यावेळी चांगलेच जाणवले असेही कुरेशी म्हणाले. केवळ एका देशाच्या अडेल पणामुळे सार्कसारखी संघटनाही किती वेठीला धरली जात आहे ते स्पष्ट दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)