शिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा

निवडणुकीच्या कामाकाज करण्यास टाळाटाळ

शिक्रापूर- सध्या सर्वत्र निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त आहेत;परंतु शासनाने नेमून दिलेले निवडणुकीचे शासकीय कामकाज करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या शिक्रापूर जिल्हा परिषद शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने शिक्षक दलात खळबळ उडाली आहे.

शिक्रापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील लदत्तात्रय माधव तांबे, वासुदेव हिरामण टाकळकर, रतन रामराव मंडलिक, मनीषा उमेश धुमाळ, सबिया अरिफ मोमीन, सुरेश सीताराम जाधव, प्रदीप शिवाजी धुमाळ, जयश्री शिवाजी धुमाळ, संध्या पांडूरंग नाणेकर या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिक्रापूर येथील तलाठी ज्ञानेश्‍वर सुदाम भराटे (रा. वाघोली, ता. हवेली, मूळ रा. सुपा, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,सार्वत्रिक निवडणूक 2019 चे कामकाज सुरळीत पार पडण्याच्या हेतूने भारत निवडणूक आयोग दिल्ली यांनी निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार वरील नऊ शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामकाज करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर निवडणुकीचे कामकाज करण्यास हे शिक्षक टाळाटाळ करीत असल्याने त्यांना यापूर्वी संदर्भात नोटीस देण्यात आलेली होती; परंतु नोटीसच्या अनुषंगाने हे शिक्षक तथा केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी लेखी म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे हे शिक्षक निवडणुकीचे महत्त्वाचे शासकीय कामकाज करण्यास जाणीवपूर्वक कसूर करत असल्यामुळे निवडणुकीचे काही कामकाज थांबलेले आहेत. त्यामुळे या शिक्षकांवर निवडणूक विषयक कर्तव्यभंगापोटी लोकप्रतिनिधित्व अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी शिरूरचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी शिक्रापूरचे तलाठी ज्ञानेश्‍वर भराटे यांची नेमणूक केली त्यानुसार गुरुवारी (दि. 18) फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे करीत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.