निवडणुकांवेळी उत्तरप्रदेशात रंगणार देवांचे युद्ध?

भाजपचा राम तर सपचा विष्णू आणि कॉंग्रेसचा शंकर
लखनौ – अयोध्येतील राम मंदिर हा निवडणुकांदरम्यानचा भाजपचा हक्काचा मुद्दा. आता भाजपला शह देण्यासाठी समाजवादी पक्षाकडून (सप) विष्णू तर कॉंग्रेसकडून शंकरनामाचा जप केला जाण्याचे संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकांवेळी उत्तरप्रदेशात एकप्रकारे देवांचे युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.

भाजप, कॉंग्रेस आणि सप या पक्षांच्या गोटांतील हालचाली आणि त्यांच्या नेत्यांची वक्तव्ये पाहता निवडणुकांत यश मिळवण्यासाठी देवांच्या आशीर्वादाचा आधार घेतला जाऊ शकतो. निवडणुका जवळ येऊन ठेपत असतानाच भाजपच्या नेत्यांकडून पुन्हा राम मंदिराचा सूर आळवला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अयोध्येत सहमतीने राम मंदिर उभे रहावे यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी नुकतेच म्हटले. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेशात भव्य विष्णूनगरी उभारण्याचा संकल्प जाहीर केला आहे. तर नुकतेच कैलास मानसरोवर यात्रेवरून परतलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख त्यांच्या पक्षाकडून शिवभक्त म्हणून केला जात आहे.

राहुल यांनी त्यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाला नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर शिवभक्त राहुल गांधी असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, राहुल यांचे स्वागत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कांवडियांच्या (शिवभक्त) वेषभूषेत केले.

या सगळ्या घडामोडी पाहता राजकीय पक्षांनी एकप्रकारे आपापल्या देवांची निवड केली आहे. आता निवडणुकांत कुठल्या पक्षाला त्याचा देव पावणार ते निकालानंतर समजेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)