निवडणुकांचा खर्च काढण्याकरिता भाजपने मुंबई विकायला काढली

सचिन सावंत यांचा आरोप
मुंबई – नवीन विकास आराखडा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला जाणार असल्याची टीका करताना, 2019 च्या निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी भाजपने मुंबई बिल्डरांना विकायला काढली असल्याचा गंभीर आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना सावंत यांनी विकास आराखडा बिल्डर धार्जिणा असल्याचा आरोप केला. बिल्डरांवर चटईक्षेत्राची खैरात केल्यामुळेच मुंबईकरांनी याच्या मसुद्याला प्रचंड विरोध केला होता. यामुळे मूळ विकास आराखडा रद्द करून अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यात दोन चटईक्षेत्र गृहीत धरूनच आखणी करण्यात आली होती. परंतु राज्य सरकारने मंजूर केलेल्या आराखड्यात पुन्हा एफएसआयची खिरापत वाटून बिल्डरांवर मोठ्या प्रमाणात मेहेरबानी करण्यात आली आहे.

मूळ मसुद्यात जवळपास 2400 दुरुस्त्या करून सरकारने मुंबईतील जनप्रतिनिधी आणि जनतेबरोबर सर्वसहमतीने विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रियाच मोडीत काढली आहे. या विकास आराखड्यामुळे भविष्यात मुंबईचा श्वास अधिक कोंडला जाणार आहे. एलफिन्स्टन रोड स्थानकावर झालेली दुर्घटनेसारख्या अनेक घटनांपासून शासनाने कोणताही बोध घेतला नाही. मुंबईतील पायाभूत सुविधा या समान असूनही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीला या आराखड्यातून वगळून भाजप सरकारने बिल्डरांसाठी नविन कुरण निर्माण करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप सावंत यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)