निर्देशांकांची विक्रमी घोडदौड चालूच 

रुपया घसरत असूनही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी 
मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धाबाबत नरमाईची भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका आणि मेक्‍सिकोदरम्यान व्यापार करार झाला झाल्यानंतर आज त्याचे सकारात्मक परिणाम जागतिक शेअर बाजारावर झाले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन निर्देशांक नव्या उचांकी पातळीवर गेले.
एकतर काल फेडरल रिझर्व्हने कमी व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. त्यातच आज अमेरीका आणि मेक्‍सिकोचा करार झाल्यामुळे गुंतवणूकदार उत्साही होते. त्यामुळे क्रुडचे दर वाढले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून आहे. बाजाराच्या दृष्टिकोनातून आणखी एक जमेची बाजू म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारही आता खरेदी करू लागले आहेत.
आतापर्यंत देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी निर्देशांकाना विक्रमी पातळीवर नेले होते. कालच्या व्यवहाराबाबत मिळालेल्या माहिती नुसार काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 252 कोटी रुपयांच्या तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1117 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. बाजार बंद होतांना मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 202 अंकानी म्हणजे 0.52 टक्‍क्‍यांनी वाढून 38896 अंकावर बंद झाला. आता सेन्सेकसला 39 हजाराचे वेध लागले आहेत.
त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मंगळवारी 46 अंकानी वाढून 11738 अंकावर बंद झाला. खत कंपन्यांना अनुदान देण्यासाठी नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता खत कारखान्यांना आडवडाभरातच अनुदान मिळू शकणार आहे. अगोदर हे अनुदान बराच काळ रखडत असे. या कारणामुळे बहुतांश खत कंपन्याचे शेअर 11 टक्‍क्‍यापर्यंत वाढल्याचे दिसून आले. काही ब्रोकर्सनी सांगितले की, अमेरीकेने भारतासह अनेक देशाबरोबर व्यापार युध्द सुरू केले असूनही भारतातील गुंतवणूकदारांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले आहेत.
छोट्या कंपन्याच्या शेअर खरेदीबाबत आज वातावरण संमिश्र होते. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 0.35 टक्‍क्‍यांनी कमी झाला तर तर स्मॉल कॅप 0.36 टक्‍क्‍यांनी वाढला. गेल्या आठवड्याच्या शेवटी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यानी सांगितले की, हळूहळू व्याजदरात वाढ केली तरच अमेरिकेन अर्थव्यवस्थेतील उभारी कायम राहील आणि रोजगार वाढेल. त्यामुळे काल जागतिक बाजारात तेजी होती. असे असले तरी आज झालेल्या नफेखोरीचा ग्राहक वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायु, रिऍल्टी आणि या क्षेत्रांना
फटका बसला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)