निरेत पोलिसांचे संचलन

नीरा- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्याची रणधुमाळी अंतिम टप्यात असून निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जेजुरी पोलिसांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नीरा (ता. पुरंदर) येथे पोलिसांनी संचलन (रूटमार्ट) केले. मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे व कायदा व सुव्यवस्था अबादित रहावी, यासाठी पोलीस सतर्क आहेत.

शनिवारी (दि. 20) संध्याकाळी सहाच्या दरम्यान पुरंदर-भोर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी नीरा गावातील मुख्य रस्त्यावरून संचलन केले. या संचलनात 1 सहायक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक तसेच 105 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.