निरीक्षण – इस्त्राईल संघर्ष आणि उत्कर्ष (भाग-1) 

माधव श्रीकांत किल्लेदार 

नमस्कार वाचकहो, बऱ्याच वर्षांपासून असतो उदय हा एकपात्री प्रयोग सर्वशक्तिमान यहूदी राष्ट्र म्हणजे इस्रायल आणि ज्यू धर्म यावर आधारित करतो आहे आतापर्यंत ह्या नाटकाचे 57 प्रयोग आपल्या संपूर्ण देशात झालेले आहेत मुळात ह्या नाटकामुळे इस स्त्राईल या विषया संदर्भात बरीच काही पुस्तकं वाचलीत त्यामधून इस्राईल नेमका कसा असेल त्याचा पूर्व इतिहास कसा असेल आणि आताच्या काळातला आधुनिक इस्राईल कसा असेल याविषयी एक थोडी जाणीव निर्माण झाली त्यामुळे हा सगळा लेखन-प्रपंच करण्याचे ठरवलं. 

मीत्रांनो 15 मे 1948 रोजी इस्रायलला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले खरं पाहिलं तर भारत आणि इस्रायल यांचा स्वातंत्र्य काळ हा समकालीनच आहे परंतु आपल्या दोन्ही राष्ट्रांचा इतिहास आपल्या दोन्ही राष्ट्रांची संस्कृती आणि आपल्या दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेले वैविध्य यामध्ये काही प्रमाणात आपल्याला साम्य आढळून येतं. खरंतर दुधा मधाचा देश असं फार पूर्वी म्हणत असत दुधा मधाचा देश म्हणजे नेमकं काय तर भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर आशिया आफ्रिका आणि युरोप या तीन खंडांचे या भूमीत मीलन होते तो लहानसा चिंचोळा प्रदेश या प्रदेशात पूर्वेस सुमारे दोनशे वर्ष शूर आणि प्रगत पॅलेस्टाईन लोकांचे प्रमुख प्रभुत्व होतं. रोमनांनी पुढे त्याला हे नाव दिलं. सध्याचा इस्रायल हा देश मूळ पॅलेस्टाईनचा पश्‍चिम भाग आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी 260 मैल असून रूंदी दहा ते बारा मैलांपासून साठ मैलांपर्यंत अनेक ठिकाणी कमी-अधिक होत गेलेली आपल्याला दिसू शकेल .सुमारे 158 एकत्र होतील तेव्हाच भारतासारख्या देशाशी त्यांची तुलना होऊ शकते तीही ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने! भूमध्य समुद्र पासून तीस-चाळीस
मैलांवर उत्तर-दक्षिण वाहत जाणारी जॉर्डन नदी हीच इस्रायल या देशाची भाग्यरेषा या नदीचं पात्र बाराही महिने अखंड वाहत असतं म्हणूनच तिला नदी म्हणायचं. नाही तर अनेक ठिकाणचे ओढेही तिला पाहून ‘पूर आलेला नाला’ असं आपण या ठिकाणी सार्थपणे वर्णन केलेले आढळते येथूनच पुढे दहा महिने घसरून

गॅंलीलीच्या सरोवरात ही नदी प्रवेश करते तेव्हाच सी ऑफ गॅंलिली असं म्हणतात म्हणजे जलाशय या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. ओसाड माळावर क्षुद्र वृक्ष ठरावा त्याचप्रमाणे हे सरोवर म्हणजे समुद्र ठरला आहे हे नावच त्या देशातील पाण्याच्या टंचाईची कल्पना आणून देण्यास पुरेसा आहे डोंगराळ भागातून उड्या घेत खाली येणारा जॉर्डनचा प्रवाह जेव्हा गॅलिली च्या सरोवरात शिरतो तेव्हा तो समुद्रसपाटीच्या खाली 628 फूट गेलेला आपल्याला आढळतो. येथून पुन्हा घसरगुंडीला प्रारंभ होतो आणि पुढील 65 मैलांचा अंतर तोडून जेव्हा ती नदी मृत समुद्रात एकरूप होते तेव्हा तिनं समुद्रसपाटीखाली तेराशे फूट खोल असणाऱ्या दरीचा तळ गाठलेला असतो पृथ्वीवरील सर्वात खोल दरी हीच आणि सर्वात विचित्र पात्रही जॉर्डनचेच कारण ज्या लिलीच्या सरोवरापासून मृतसमुद्र पर्यंतच्या प्रदेशातील इतकी नागमोडी वळणे किंवा आढेवेढे घेतलेले आहेत की 65 मैलांचे अंतर तोडायला या नदीला 200 मैल लांबीचा मार्ग आक्रमक व्हावा लागतो उंच वाहनातून लिहून आणि झपाट्याने उतरत जाऊन सर्वात खोल विवरात प्रवेश करणाऱ्या नदीचं नाव हिब्रू भाषेत ‘उतरत जाणारी नदी’ या अर्थाने असं नाव पडलं तर त्यात नवल ते काय?

जॉर्डन नदीचे भवितव्य ज्या मृत समुद्राचे निगडित आहे त्याच स्वरूपात ध्यानी घेता या नदीने इतके आढेवेढे का घेतले असतील याचा उलगडा सहज होऊ शकतो. एक तर धरणीकंप यामुळे झालेल्या त्या भागातील विलक्षण उलथापालथीमुळे ह्या समुद्राच्या जगातील अन्य समुद्रांशी असणारे संबंध तुटले असून वाळीत टाकल्याप्रमाणे त्याची अवस्था झाली आहे त्याच्या पाण्यात इतर समुद्राच्या पाच पठार असून त्यात प्रामुख्यानं ब्रोमाइड, मॅग्नेशियम इत्यादी द्रव्य विपुल प्रमाणात आहेत त्यामुळेच रसायनाची द्रव स्थितीतील खाण असा त्याचा उल्लेख केला जातो सुमारे 40 महिला आणि दहा मैल रुंद असणाऱ्या या कालव्यातील निळ पाणी कडू आणि तेलकट असून वीस-पंचवीस फूट खाली शिंपा स्पष्ट दिसू शकतात इतका ते पारदर्शक आहे त्यातील विविध क्षारांमुळे त्यात मासे जगू शकत नाहीत एवढेच नव्हे तर त्याच्या परिसरातही प्राणी दिसत नाहीत प्रत्येक दिवशी जॉर्डन नदीतून 65 लक्ष टन पाणी यात येतं पण येथील उष्णतापमानामुळे त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन मृत समुद्राची अवस्था जशीच्या तशीच राहते!

या जॉर्डन नदीच्या दोन्हीकडे डोंगरांच्या समांतर रांगा पसरलेल्या असून त्यातून लहान-लहान जलप्रवाह या नदीला येऊन मिळतात हे डोंगर पंधराशे ते दोन सहस्त्र फूट उंचीचे असून सचित्र चुनखडीचा दगड आमचे तर त्या ठिकाणी आढळतात उत्तरेस लेबनॉन पासून निघणाऱ्या रांगा दक्षिणेस नाही वाळवंटापर्यंत गेलेले आहेत म्हणजे ही डोंगर पट्टी साधारण 200 मैल लांबीची आहे देशाच्या मधून वाहणारी नदी आणि तिच्या घटकांवरील डोंगराळ भाग हाच धर्म आणि राजकारण्यांच्या असंख्य उलाढालीतीलही विख्यात ठरलेला आहे जॉर्डनच्या पाण्यातच योगी योहान येशू ख्रिस्ताला धर्म दीक्षा दिली हे या नदीच्या पश्‍चिमेकडील गेली नेसणाऱ्या यातील उंच पठारावरील निसर्ग रमणीय प्रदेशात यशुचा संचार झाला जॉर्डन नदीच्या पश्‍चिमेकडील भागात गेलेली समारिया आणि जुडिया हे पठार आहेत आणि समुद्रकिनाऱ्याच्या सखल आणि सपाट प्रदेश यांचा यात अंतर्भाव होतो त्याच्या दक्षिणेकडील भागाला नेगेव्ह म्हणून ओळखले जातं.

किनारपट्टीसह सारा प्रदेश मुळात बेताचा सुपीक आणि कष्टापासून पीक न देणारा मेंढ्यांचे कळप घेऊन भटकणाऱ्या विविध डोळ्यांनी शतकानुशतकं हा प्रदेश तुडवलेला आहे बकऱ्यांच्या कातड्याचे तंबू ठोकून त्यात राहणाऱ्या आणि त्या प्राण्यांच्या दुधावर आणि माणसावर उपजीविका करणाऱ्या डोळ्यांचे परस्परातील अति प्रतीचे जीवघेणे संघर्ष हे त्यातील मूळ स्वरूप आहे किंबहुना हा त्यांचा मूळ इतिहास आहे या प्रदेशात ऋतू प्रामुख्याने दोनच एक तर महाभयंकर उन्हाळा आणि दुसरा पावसाचा होणारा हिवाळा मे महिन्यापासून ऑक्‍टोबरपर्यंत येथे प्रचंड प्रमाणात उन्हाळा असतो तेव्हा पारा 110 अंशांपर्यंत असतो तर दक्षिणेकडील इतर भागात तर उष्णतामान 125 अंशांपर्यंत जाऊन पोहोचतो दिवसभर मंद वारा आणि रात्री जमिनीकडील गार वारा यांची ये-जा चालू होते नोव्हेंबरपासून ऋतू पालटतो थंडीचा कडाका जाणवू लागतो.

डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात थंडी वाढता वाढता डोंगरांची शिखरं बर्फाच्या कानटोपी घालून जणू स्वतःचे यापासून रक्षण करू पाहतात. या काळात जॉर्डनच्या खोऱ्यात आणि क्वचित 116 मैलांच्या किनाऱ्याजवळील भागातही अल्पप्रमाणात सुखद वर्षाव होतो इस्रायलच्या याच उत्तर भागातील डोंगरी आणि पठारी प्रदेशात सुमारे 40 इंच वृष्टी होते आणि दक्षिणेकडील नेगेव आणि लाल समुद्रावरील भागाकडे थोडा पाऊस कमी होतो पाऊस आधीच कमी आणि त्यात भूमध्य समुद्र जवळ असल्याने पश्‍चिमेकडे निरुंद किनारपट्टी तिथून धावत जाणारे यॉर्कन आणि किशोन जलप्रवाह हे खाऱ्या खाड्या म्हणून जाण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्याकडील नद्यांप्रमाणे तिकडील नद्या आणि शेतीच्या दृष्टीने विशेष उपयुक्त आहेत अशी अवस्था असल्यानेच दोन-तीन सहस्त्र वर्षांपूर्वी इजिप्तमधील गुलामगिरीच्या भयानक जाचातून मुक्त विमुक्त होऊन या प्रदेशाच्या आश्रयाला आलेल्या इस्रायली लोकांनी येथील शेळ्यामेंढ्या उंट आणि गाढव यांच्या सहज आणि विपुल मिळणाऱ्या दुधामुळे आणि जॉर्डन नदीच्या दोन्ही कडील डोंगरातून विनामूल्य मिळणाऱ्या मधामुळे याचं दुधाचा देश असं वर्णन केलेल आपल्याला आढळतं.

अशा सुपीकतेची वासलात असलेल्या प्रदेशातील बहुतेक जमीन काही श्रीमंत तुर्क आणि अरब यांच्या हातात होती आणि इजिप्तमधून आणलेले फेलाहीन म्हणजेच शेतमजूर आणि अरब यांच्याकडून जमेल तितक्‍या प्रमाणात ती जमीन कसून घेतली जाई. या शेतात राबणाऱ्या शेतात राहणाऱ्यांना एक प्रकारचे दास्यत्व त्याकाळी पत्करावे लागेल पुरेशी मजुरी न मिळाल्याने जमिनीच्या धन्याकडून कर्ज काढून त्यांना उपजीविका करणारा भाग पडेल अशा घेतलेल्या कर्जाऊ पैशांसाठी प्रतिवर्षी प्रतिशत 50 टक्के व्याज देणे हा नेहमीचा शिरस्ता होता पण काही वेळी 200 टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाचा दर चढूनही काही आश्‍चर्यकारक गोष्ट त्या काळी नव्हती ह्या ग्रंथाचा अनुभव असा की पॅलेस्टाइनमधील निम्म्याहून अधिक लोक हे अर्ध उपाशीच असत.

अशा तऱ्हेने राज्यकर्ते छळीक नि शासनाच्या दृष्टीने अपात्र होते पण अशाही स्थितीत जगातील देशोदेशी विखुरलेल्या ज्यू लोकांची म्हणून या भूमीकडे अधिकाधिक आकृष्ट होऊ लागली होती त्याप्रमाणे सावरकरांनी म्हटले आहे की प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी! त्याचप्रमाणे मातृभूमीच्या उत्कट भक्तीतून स्वदेशाकडे परतण्यासाठी त्यांच्या दृष्टीने जॉर्डन नदी हा लहानसा जलप्रवाह वाटत नव्हता तर ती जणू त्यांच्या थोर परंपरा याची साक्ष देणारी पावनगंगा त्यांना वाटत होती तेथील तेथील रुक्ष डोंगरांच्या कडेकपारीतून घुमणारे रणझुंजार पूर्वजांचे घंटानाद त्यांना ऐकू येत होते नि वाळवंटातील पाऊलवाटा त्यांच्या वडिलांनी व्यापार करून दाही दिशातून आणलेल्या अमाप संपत्ती त्यांना आठवण देत होत्या दोन-तीन हजार वर्षातील जीवनाचे दुःखात कहाणी सांगणारे सर्व असंख्य शिल्प-अवशेष प्राचीन वैभवाची स्मरण करून देऊन भव्यदिव्य भवितव्याचे शिल्पकार ही अशीच घोषणा ते देऊ लागले होते अशाच एका देशभक्तांना लिहिलंय की ही एवढी भूमी आहे पण हेच या भूमीच्या पवित्र कणाकणातून हौतात्म्याने वैभव यांच्या मंगलमस्मृती आज निवसत आहेत तेव्हा या भूमीकडे अशी ओढ घेणारे जे कोण आणि त्यांचे या भूमीशी नाते तरी कोणते होते हे पाहणं आपल्याला आता प्रेरक ठरेल.

क्रमश: 
(प्रस्तुत लेखातील काही भाग हा संदर्भ म्हणून ना. ह. पालकर ह्यांच्या ‘छळकडून बळाकडे” ह्या पुस्तकातून घेण्यात आला आहे)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.