निरंजनी आखाड्यातील महंत आशिष गिरी यांची आत्महत्या

प्रयागराज : निरंजनी आखाड्याचे महंत आशिष गिरी यांनी रविवारी सकाळी पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे आखाड्यात एकच खळबळ उडाली. महंत आशिष गिरी हे अनेक आजाराने ग्रस्त होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष गिरी म्हणाले की, रविवारी सकाळी 8 वाजता माझे आशिष गिरींबरोबर बोलणे झाले होते. त्यांना नाश्‍ता करण्यासाठी मी मठात बोलावले होते. त्यावेळी आशिष गिरी यांनी आंघोळीनंतर येतो असा निरोप दिला. काही वेळानंतर ते न आल्यामुळे मठात राहणारे काही शिष्य त्यांच्या निवासस्थानी गेले. दुसऱ्या मजल्यावर त्यांचा दरवाजा उघडा दिसला. अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात आशिष गिरी यांचा मृतदेह पडला होता. त्यांच्या हातात पिस्तुल होती.

दरम्यान, आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी, पोलीस महासंचालक के. पी. सिंह, पोलीस अधीक्षक बृजेश श्रीवास्तव आणि न्याय वैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष गिरी हे उच्च रक्तदाब आणि पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांचे यकृतही खराब झाले होते. यामुळे आलेलया नैराश्‍येतून त्यांनी आत्महत्या केली असावी, असे प्राथमिक तपासात समजते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)