निम्मी फी भरुन प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करु

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

कोल्हापूर – राजर्षि शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निम्मी फी भरुन प्रवेश देण्याचे निर्देश सर्व महाविद्यालयांना राज्य शासनाने दिले आहेत. जी महाविद्यालये निम्मी फी भरुन प्रवेश देणार नाहीत किंवा प्रवेश देण्यात टाळाटाळ करीत असतील तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजर्षि शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो टेक्‍नॉलॉजी सायन्स विभागात आयोजित केलेल्या बैठकीत पाटील बोलत होते.

शिक्षण शुल्क योजनेच्या अंमलबजावणीत टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांची गय केली जाणार नाही, असा इशारा देवून पाटील म्हणाले, शासनाने 8 लाख पर्यंतचे उत्पन्न्‌ असलेल्या विद्यार्थ्यांची 605 कोर्सेससाठीची 50 टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना निम्मी फी भरुन प्रवेश देणे बंधनकारक केले आहे.

50 टक्के फी भरुन प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालयांची परवानगी रद्द करण्याबरोबरच त्यांच्यावर फौजदारी दाखल केली जाईल, असेही ते म्हणाले. याबरोबरच ज्या विद्यार्थ्यांनी 100 टक्के फी भरली असेल त्यामधील 50 टक्के फी संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्याचा निर्णयही प्राधान्य क्रमाने घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)