निमसाखर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

निमसाखर- निमसाखर व परिसरात रविवारी (दि. 27) रात्री वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या मध्यम व जोरदार सरी कोसळ्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.दरम्यान झालेल्या वादळामध्ये ठिकठिकाणी झाडे कोसळली तर विजेचे खांब पडले होते. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे काही ठिकाणी आज (सोमवार) दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
निमसाखर व परिसरातील वाड्यावस्त्यांवर रविवारी रात्री आठ ते साडेआठाच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह आकाशात विजा चकमायला सुरुवात झाली, त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीप्रमाणत दिलासा मिळाला. दरम्यान, या वादळीवाऱ्यामुळे अनेक गावात अनेक झाडे उन्मळुन पडली. याचबरोबर महावितरणचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.दरम्यान, खंडित झालेला वीज पुरवठा आज दुपारी सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. दरम्यान, या सोसाट्याच्या वादळामुळे गावातील पवारगल्ली भागात काटेरी झाड दुचाकीवर कोसळल्याने पंढरीनाथ धनवडे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर निमसाखर-वीरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी झाड कोसळल्यापने या रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळविली होती. दरम्यान, यापावसामुळे थोडेफार नुकसान झाले असले तरी या पावसाचा ऊस, मक्‍यासह इतरफळबागांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)