निमसाखरमध्ये शासकीय जागांवरच “डल्ला’

निमसाखर- निमसाखर व परिसरात शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण करण्यामध्ये गावगुंड, सरकारी कर्मचारी, व्यापरी, सर्वसामन्य नागरिक आणि झोपडपट्टीधारकांनी या जागा बळकावल्या आहेत. यामध्ये गायराण व गावठाणसह अन्य शासकीय जागांवर सुमारे चार ते पाच हेक्‍टरपर्यंत अतिक्रमणे केली आहेत. तर आर्थिकदृष्ट्या गरजुंची अतिक्रमणे नियमित करुन सधन व प्रभावशाली मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
निमसाखर गाव परिसरात शेतीमहामंडळाची 55.93 हेक्‍टर, सामाजिक वनीकरण विभागाची 31. 30, गायराणासाठी 31.68, तर गावठाण क्षेत्र 4.05 हेक्‍टर अशी चारही विभागाची सरकारी 122 हेक्‍टर क्षेत्र आहे. गायरान भागासह गावठाण भागातही अतिक्रमणे असून यात सार्वजनिक वनीकरणातही असल्याची कुजबुज आहे. निमसाखर हे पाच मोठ्या वाड्यावस्त्यांचे मिळून सुमारे साडेपाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या गावामध्ये सरकारी जागेवर यापूर्वी जुनी अतिक्रमणे आहेत व सध्याही कुणी कुठेही मिळेल तिथे अतिक्रमणे बिनधास्तपणे केली जात आहेत. मताच्या पेटीसाठी गावपुढारी सुद्धा यात काही कमी नसल्यामुळे “तेरी भी चुप मेरी भी चुप’ यामुळे स्थांनिकांनी अनेक ठिकाणी जागा बळकावल्या आहेत.काही राजकारणांनी शासकीय जमिनी बळकवल्या असल्याची चर्चा दबक्‍या आवाजात आहे. यात बऱ्याच संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक गुंड प्रवृत्तीचे राजकारणाशी जवळीक असलेली काही मंडळी, मोलमजुरी करुन पोट भरुन काम करणाऱ्या गरीब कुटुंबेसुद्धा घरे शासकीय जागेत असल्याची माहिती पुढे येत आहे. गावठाण भागातही अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली असून यापूर्वी आत्ताही या आतिक्रमणाकडेही संबंधितांच्या दुर्लक्षामुळे प्रशस्त अशा रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले असून रस्ता “दाटी’त अडकला आहे.

  • … तर ग्रामपंचायतील मोठा महसूल मिळेल…
    या पूर्वी अतिक्रमणे काढली गेली नसली तरी मात्र गरजू वर्षांनुवर्ष राहत असलेल्या कुटुंबाची घरे नियमित करण्यात यावी, अशी मागणी या नागरिकांमधून होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी किंवा अतिक्रमणे नियमित केल्यास ग्रामपंचायतला कर रुपाने मोठा महसूलही मिळेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
  • … अतिक्रमणे किती हे स्पष्ट होईल
    शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वाटप झाल्यानंतरही निमसाखर हद्दीत अनेक ठिकाणी मंडळाच्या उरलेल्या शेतजमिनीवर काही प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मात्र सध्या मोजणी विभागाकडून मोजणीचे काम रखडले आहे. संबंत विभागाकडून हे काम लवकरच मार्गी लावले जाऊन अतिक्रमणे किती हे स्पष्ट होऊन नंतर कारवाई होईल, असे अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.
  • वनीकरणाची जागाही गिळंकृत
    निमसाखर भागात सार्वजनिक वनीकरण विभागाचे 31.30 क्षेत्र असून पूर्वी मोठ्या संख्येने या भागात वृक्षलागवड केली गेली होती. मात्र, नंतरच्या काळामध्ये संबंधितांचे दुर्लक्ष झाले आणि सध्या झाडे कमी, पण काटेरी झुडपेच जास्त अशी अवस्था आहे. या ठिकाणी स्थानिक राजकारणांशी संलग्न असलेले गुंड प्रवृत्तीने या ठिकाणी रस्ते केले आहेत. याच बरोबर काही सधन शेतकऱ्यांनी सुद्धा वनीकरणांची जागा शेतीसाठी गिळंकृत केल्याची परिसरात चर्चा आहे. अशा जागा वनीकरण विभाग आपली जागा मोजून ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)