निबंध स्पर्धेत आवटे विद्यामंदिरातील ऋषिका प्रथम

शिवनेरी-जागतिक मूक बधीर दिनानिमित्त रोटरी क्‍लब ऑफ शिवनेरी जुन्नर आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत आण्णासाहेब आवटे विद्यामंदिरातील ऋषिका कैलास रुपनर हिने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष भरत चिलप यांनी दिली.
रोटरी क्‍लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने हेलन केलर एक प्रेरणा स्थान या विषयावर निबंधस्पर्धेचे आयोजन केले होते यात विविध शाळांतील 132 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम मूकबधीर विद्यालय जुन्नर येथे झाला. यावेळी बोलताना डॉ. सुनील शेवाळे म्हणाले, रोटरीचे काम उलेखनीय असून रोटरीने मूकबधीर विद्यालयासाठी भरीव अशी मदत केलेली आहे. यूथ डायरेक्‍टर धनंजय राजूरकर यांनी हेलन केलर यांचे विषयी माहिती उपस्थितांना दिली. या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष भरत चिलप, सेक्रेटरी रंजन घोडेकर, जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष गणेश बुट्टेपाटील, संजय बुट्टेपाटील, डॉ. सुनील शेवाळे, धनेश संचेती, राहुल जोशी, डॉ. आनंद सराईकर, अनिल जोगळेकर, सुधिर ढोबळे, रोटरीयन विजय कोल्हे, चेतन शहा, नितीन माळवदकर, विलास कडलग, तुषार लाहोरकर, मुकबधीर विद्यालयाच्या मुध्याध्यापिका हिरामठ महानंदा, शिक्षिका तिवाटने आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम क्रमांक ऋषिका कैलास रुपनर आण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर, द्वितीय ओंकार चव्हाण ब्रह्मनाथ विद्यालय पारुंडे, तृतीय सारा शिंदे कुलस्वामी विद्यालय वडज, मूकबधीर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना डॉ. आनंद सराईकर यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. तसेच मूकबधीर शाळेचा माजी विद्यार्थी नितीन बटवाल जो शासकीय सेवेत आहे त्याचाही सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)