निदर्शकांत घुसणारे समाजकंटक समस्यांचे मूळ – रजनीकांत

चेन्नई (तामीळनाडू) – 100 दिवस शांततापूर्ण मार्गाने चाललेले स्टरलाईटविरोधी निदर्शन नंतर हिंसक बनले, ते समाजाविरोधी तत्त्वांनी निदर्शकांत घूसखोरी केल्याने. आणि त्यानंतर पोलीस गोळीबाराता 13 जणांचा बळी गेला. कोणत्याही निदर्शकांत घुसणारे समाजकंटक समस्यांचे मूळ असल्याचे उद्‌गार सुपरस्टार आणि रजनी मक्कल मंदरम चे संस्थापक रजनीकांत यांनी काढले आहेत.

तुथूकुडी येथील पोलीस गोळीबारात जखमी झालेल्यांना तुथूकुडी येथील हॉस्पिटलमध्ये भेटून आल्यानंतर एका खासगी रिसॉर्टमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. जर प्रत्येक गोष्टीवरून सतत निदर्शने होत राहिली तर तामिळनाडूचे रूपांतर स्मशानभूमीत होईल असे उद्गार त्यांनी काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुथूकुडीमध्ये निदर्शने करणारे हे सामान्यजन होते, त्यात मच्छिमारांचाही समावेश होते, हे निदर्शक निष्पाप-सज्जन सज्जन होते. मात्र निदर्शकांमध्ये समाजकंटक तत्त्वे घुसली. त्यांनी समस्या निर्माण केल्या. समाजविघातक तत्त्वांनी पोलीसांवर हल्ले केले आणि त्यानंतरच सर्व समस्या निर्माण झाल्या.

आपले काम करणाऱ्या पोलीसांवर हल्ला करणे आपल्याला कधीही मान्य नाही असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले. अशी कामे करणाऱ्या समाजकंटकांना पोलीसांनी ताबडतोब ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. स्व. मुख्यमंत्री जयललिता यांनी तसे केल्याचे रजीाकांत यांनी सांगितले. जल्लिकट्टू निदर्शनाच्या अखेरच्या दिवशीही अशाच कारणांनी समस्या निर्माण झाल्याचा उल्लेख रजनीकांत यांनी केला.

तुथूकुडी पोलीस बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना दहा हजार रुपयांची मदत रजनी मक्कल मंदरमने जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)