निकोप आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करावी – अर्चना बोराडे

मंचर- शेतकरीबंधूनी आपल्या शेतात किमान सेंद्रिय शेती करून कुटुंबातील बालक आणि सदस्यांच्या निकोप आरोग्याची जोपासना करावी, असे आवाहन अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना बोराडे यांनी केले.
एकलहरे-लोंढे मळा (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे सुरू असलेल्या वय वर्षे एक ते सहा वयोगटातील मुलांच्या अंगणवाडी परसबाग प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी अर्चना बोराडे बोलत होत्या. मुलांना स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळावा, ज्याचा उपयोग शालेय पोषण आहारात होऊ शकेल. या हेतूने येथे लोकसहभागातून रासायनिक खतविरहित परसबागेची योजना राबवून ती यशस्वी केली आहे. अमोल डोके, सचिन लोंढे, योगेश लोंढे, बाळू लोंढे, गणेश लोंढे, संजीवनी पोखरकर, अनुसया बाणखेले, पुष्पा उपाध्ये आदी ग्रामस्थांनी ट्रॅक्‍टर, सुपीक माती, अवजारे आदींच्या सहाय्याने परसबाग तयार करून त्यामध्ये शेवगा, पालक, आळू, फ्लॉवर, कोबी, वांगी, कढीपत्ता, राजमा, भोपळा, तूर, मेथी, कोथिंबीर यांच्या रोपांची यशस्वी परसबाग वाढविली आहे. अंगणवाडीतील बाळगोपाळांची भाजी रोपाची वृक्षदिंडी काढण्यात आली होती. अंगणवाडी सेविका मनीषा बाणखेले आणि मदतनीस मनीषा संजय घारे यांनी वृक्षदिंडीची व्यवस्था पाहिली. मनीषा बाणखेले यांनी प्रास्ताविक केले आणि मनीषा घारे यांनी सूत्रसंचालन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)