निकृष्ट कामामुळे गोंदवलेचा बंधारा खचला

गोंदवले खुर्द : बंधाऱ्याचा पाया खचल्याने पाणी वाया जात आहे. (छाया : संदीप जठार)

पाणी मोठ्या प्रमाणात वाया : दुरुस्तीची मागणी

गोंदवले, दि. 26 (वार्ताहर) – गोंदवले खुर्द, ता. माण येथील माणगंग नदीवरील बंधाऱ्याचा पाया खचला असून त्यातील दगड निघून गेल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने काम केल्यानेच बंधाऱ्याच्या काम निकृष्ट झाले असून संबंधीत खात्याने त्वरीत लक्ष देवून दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
माणनदी पात्रात पंधरा वर्षापूर्वी जिहे-कठापुर उपसा जलसिंचन कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत सुमारे 35 लाख खर्च करुन कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. माणगंगेचे पात्र याठिकाणी पूर्ण खडकाळ आहे. त्याचठिकाणी अगोदर पाया काढण्यासाठी संबंधीत ठेकेदाराने नदीतील खडकात जेसीबी पोकलेनला पाया निघत नसल्याने त्याने ब्रोकर मशीनचा वापर न करता थेट जिलेटीनने दहा फूट खोली घेवून स्फोट केले. त्यामुळे सर्व खडक हादरले. खडकांना छिद्रे भेगा मोठ्या प्रमाणात पडल्या. याच स्थितीत त्याने पाया काढून बांधकाम केले. सुमारे 21 दरवाजे आणि खिडक्‍या याठिकाणी आहेत. संपूर्ण बंधारा पूर्ण झाल्यावर माण नदीला पावसाळ्याच्या दिवसात अचानक पूर आला. यानंतर आलेल्या पहिल्या पाण्याने साठा झाला. परंतु, खडक हादरल्याने पाणी साठून न राहता बंधाऱ्याच्या दरवाजात न अडता हादरलेल्या खडकातुन निघून गेले. परिणामी, बंधारा कोरडा ठणठणीत पडला. त्यानंतर संबंधीत ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली. तथापपि, ठेकेदाराने पाहण्याचे नाटक करून पुढे काहीच उपाययोजना केली नाही. परिणामी, एवढा मोठा बंधारा असूनही पाणी आल्यावर जास्त दिवस पाणी साठून राहत नाही. प्रत्येकवेळी दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात याठिकाणच्या लोखंडी फळ्या दरवाजात टाकुन ते पॅक करावे लागतात. पण पृष्टभागातील खडकच हादरल्याने काहीही केले तरी फारसा उपयोग होत नाही. दरम्यान, ही समस्या असताना बंधाऱ्याचा पाया उत्तर बाजूच्या दिशेने खचू लागला. उत्तर बाजुने सुमारे तीस फुट लांब आणि तीन फुट उंच असे खडक निघून गेल्याने बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. यामुळे त्याठिकाणच्या लाभ क्षेत्रातील लोकाना या बंधाऱ्याचा अजिबात उपयोग होत नाही. परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्याऐवजी घटू लागली आहे.त्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती तत्काळ होणे गरजेचे आहे. हीदुरुस्ती करताना फळ्या टाकण्याऐवजी सिमेंटने ठरावीक उंचीवर एकदाच पॅक केला तर जास्त झालेले यावरून वाहून जाईन व बंधाऱ्यात पण पाणी शिल्लक राहील, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)