ना पिण्यासाठी पाणी; ना खाण्यासाठी घास

मदत मागायची तरी कोणाला : नागरिकांकडून उद्गविग्न सवाल

पुणे : घरात पाणी घुसलेल्या संसार उद्ध्वस्त झालेल्या दांडेकरपूल वसहतीमधील नागरिकांना आज प्रशासन तसेच निसर्गाच्या असंवेदनशितलेचाही सामना भरल्या डोळयांनी करावा लागला. त्यामुळे मदत मागायची तरी कोणाला असा उद्गविग्न सवाल कालवा फुटून संसार वाहून गेलेल्या शेकडो नागरिकांनी आज उपस्थित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरूवारी सकाळी कालवा फुटल्याने दांडेकर परिसरातील स.नं 124, 130 व 133 मधील जवळपास पाचशेंहून अधिक घरांमध्ये पाणी घुसले होते. सकाळची वेळ असल्याने कर्ते पुरूष तसेच महिला कामावर होत्या, तर मुले शाळांमधे गेली होती. त्यामुळे जवळपास प्रत्येकाच्याच घरात दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती. मात्र, अचानक आलेले पाणी प्रत्येकाच्या घरात जवळपास पाच ते सहा फूटांपर्यंत चढले होते त्यामुळे घरातील सर्व साहित्य पाण्यात तरंगत होते. त्यामुळे घरातील पैसे आणि दागिने वाचविल्यास या घटनेनंतर गाठीला काही तरी राहील असा विचार करून हाताला लागेल ते घेऊन नागरिक जीव वाचवित होते.

सुमारे साडेअकरा वाजता घरांमध्ये घुसलेले ओसरण्यास अडीच वाजले, त्यानंतर नागरिक पुन्हा घराकडे परतले, तसेच पाणी काढत होते. मात्र, यावेळेत या ठिकाणी घरांबाहेर मात्र, पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबरच पालिका अधिकाऱ्यांचा ताफाही होता. मात्र, त्यांच्याकड़ून केवळ नागरिकांच्या व्यथा ऐकल्या जात होत्या. प्रत्यक्षात ही घटना घडल्यानंतर नागरिकांचे संसार वाहून गेले असल्याने पालिकेने तातडीने पाणी पुरवठयाची सोय करणे अपेक्षीत होते. त्यातच गुरूवार असल्याने शहराचा पाणी पुरवठाही बंद असल्याने या नागरिकांना पिण्यासाठी पाणीच नव्हते. पालिकेचा पहिला टॅंकर संध्याकाळी साडेचार वाजता या भागात सोडण्यात आला. त्यानंतर नागरिकांना पाणी देण्यात आले, मात्र, प्रत्यक्षात या नागरिकांकडे पाणी घेण्यासाठी भांडीही नव्हती. त्यामुळे पाणी घ्यायचे तरी कशात असा प्रश्‍न नागरिकांना होता.

जेवणाचा पडला विसर
ही दुर्घटना सकाळी साडे अकरा वाजता घडल्यानंतर या भागातील हजारो नागरिक बेघर झाल्याचे महापालिका प्रशासनास माहित होते. त्यामुळे पालिकेकडून तातडीने या नागरिकांच्या खाण्या पिण्याची सोय करणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेत 3 वाजता मुख्य सभा असल्याचे कारण देत पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी घटनास्थळावरून निघून गेले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना होती. तर दुपारी चार वाजले तरी, या भागातील नागरिकांना खाण्यासाठीच काहीच नव्हते. त्यामुळे हे नागरिक उपाशी पोटीच घरातील मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना घेऊन घरातील पाणी काढण्यासाठी वेळ घालवित होते. मात्र, त्यांना मदतीसाठी कोणीही प्रशासनाकडून पुढे आले नाही.

पावसानेही केली तारांबळ
कालव्याचे पाणी घुसल्याने आंबील ओढा स.नं 133 च्या मागील बाजूस असलेली आंबील ओढाच्या बाजूची जवळपास वीस ते पंचविस घरे पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे त्या घरांमधील सामानही ओढयाच्या आत पडले होते. तर अडीचच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर नागरिकांकडून घरातील पाणी काढण्याबरोबरच घरातील साहित्य सुकण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. मात्र, या नागरिकांचा त्रास संध्याकाळीही संपणारा नव्हता.सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरात मुसळाधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आधीच उपाशी पोटी असलेल्या या नागरिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडून त्यांना आणखी एका मनस्तापाचा सामना करावा लागला. त्यामुळे या नागरिकांच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)