नासाच्या नव्या ऍपद्वारे काढता येणार ग्रह ताऱ्यांसोबत सेल्फी

न्यूयॉर्क – नासाने तयार केलेल्या एका ऍपमुळे लोकांना अंतराळातील ग्रहताऱ्यांबरोबर सेल्फी काढता येणार आहे. तसेच ट्रॅपिस्ट-1 या ग्रहमंडळाबरोबरही सर्वांना सेल्फी काढता येणार आहे. ट्रॅपिस्ट 1 मध्ये पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह आहेत. खगोलप्रेमींसाठी ही एक अनोखी भेटच म्हणावी लागेल.

“आरएडी’ असे ऍपचे नाव आहे. नासाने स्पीट्‌झर स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणीद्वारे अंतराळात अनेक शोध लावले आहेत. तसेच अंतराळातील लाखो अनोख्या ग्रहताऱ्यांची, घटनांची छायाचित्रे टिपली आहेत. या दुर्बिणीचे कामकाज सुरु होऊन 15 वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ नासाने हे ऍप तयार केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आकाशगंगेच्या मध्यभागी तिंवा ओरियन नेब्युलाच्या शेजारी स्पेससूट घालून उभे आहोत अशा पद्धतीचा आभास तयार करुन लोकांना फोटो काढता येणार आहेत. हे सर्व फोटो आभासी असतील. अशा प्रकारचे सेल्फी काढण्यामागे कोणते विज्ञान आहे याचीही माहिती नासा देणार आहे. स्पीट्‌झरने काढलेल्या 30 फोटोंचा समावेश सध्या यात केलेला आहे. इतर अनेक फोटो या ऍपमध्ये लवकरच समाविष्ट केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)