नाशकात मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकले

पोलीस तपास सुरू : कुत्र्याने पिशवी उचलून आणल्याने घटना उघडकीस
नाशिक – पाच दिवसांचे मृत अर्भक रुग्णालयाच्या परिसरात आढळल्याने नाशिक शासकीय रुग्णालयात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाच्या आवारातून कुत्र्याने अर्भक उचलून आणल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या अर्भकाला नातेवाईकांनी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून रुग्णालयाच्या परिसरातच टाकून दिले. पाचव्या दिवशी या अर्भकाला कुत्र्याने भक्ष्य केले. ही पिशवी कुत्र्याने फरफटत पोलीस चौकीजवळ आणल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि मग चौकशी सुरु झाली.

इगतपुरी तालुक्‍यातील आदिवासी महिलेची 25 सप्टेंबरला प्रसूती झाली. प्रसूती दरम्यान बाळ दगावले. त्यानंतर मृत बाळाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र नातेवाईकांनी बाळावर अंत्यविधी न करता रुग्णालयाच्याच आवारात फेकून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अज्ञात व्यक्तींनी अंत्यविधी करू नका अर्भक इथेच फेकून द्या, असे धमकावल्याने रुग्णालयाच्या आवारातच बाळ टाकून दिले, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर रुग्णालय प्रशासनाने यातून अंग काढून घेतले. मृत्यूनंतर अर्भकाचा पुढचा विधी करणे ही सर्वस्वी नातेवाईकांची जबाबदारी असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
शेकडोंच्या संख्येने अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची वर्दळ असताना पाच दिवस अर्भक कोणालाच कसे दिसले नाही याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. आदिवासी कुटुंबाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असण्याची शक्‍यता खुद्द रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)