नालासोपारा स्फोटकांप्रकरणी आणखी एकास अटक

मुंबईत एटीएसची कारवाई : माझगाव डॉकमधून घेतले ताब्यात, 31 ऑगस्टपर्यत कोठडी
मुंबई – नालासोपाऱ्यातील स्फोटकांप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली आहे. मुंबईतील माझगाव डॉकमधून अविनाश पवार नावाच्या व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. यापूर्वी एटीएसने ठिकठिकाणी कारवाई करत वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर या चौघांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या चौघांच्या चौकशीत अविनाश पवार याचे नाव आल्यानंतर एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अविनाश पवार हा कट्टर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता असून सनातन संस्था तसेच इतर हिंदूत्त्ववादी संघटनांशी त्याचा संपर्क होता. तो सरकारी कर्मचारी असून तो माझगाव डॉक येथे कार्यरत आहे. एटीएसने त्याला माझगाव डॉकमधूनच अटक केली. या संघटनांच्या माध्यमातून तो दोन वर्षांपूर्वी या चौघांच्या संपर्कात आला. त्याच्या घरातून कॉम्प्युटरचा सीपीयू आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, स्फोटकांप्रकरणात त्याची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याने काही प्रशिक्षण घेतले आहे की नाही किंवा त्याला बॉम्ब बनवता येतो की नाही, हे चौकशीत स्पष्ट होईल, असे अधिका-यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)