नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 4 दिवसीय निवासी शिबिर

मंचर- शेवाळवाडी-मणिपूर (ता. आंबेगाव) येथील नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी लाठीकाठी, फायरजंम्प, रोपक्‍लाइम्बिंग, झिप लायनर, मार्शल आर्ट, योगा, अडथळे पार करणे, आर्चरी, रायफल शुटींग, टेकिंग, कमांडो नेट, मंकी क्रौल, एरोबिक्‍स, रिव्हर राफ्टींग तसेच जंगल सफारी, दांडपट्टा, मल्लखांब, मिलिटरी ट्रेनिंग, फिल्ड डाफ्ट आदी चित्तथरारक प्रशिक्षण देण्यात आले. बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या 4 दिवसीय निवासी शिबिरासाठी 100 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. शिबिराचे उद्‌घाटन नालंदा विद्यालयाच्या संचालिका नेत्रा शहा, एम.सी.एफ.चे संचालक आर. डी. बोऱ्हाडे, एस. बी. जाधव यांच्या हस्ते व प्राचार्या करुणा मनुजा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

अनेक धाडसी उपक्रम आणि अडथळे कसे पार करावेत याचे उत्तम मार्गदर्शन एम.सी.एफ.चे प्रशिक्षक राजू गोसावी, अमोल जाधव, अमोल बल्लाळ, विकास खरात यांनी विद्यार्थ्यांना दिले. बांबू आणि टायरच्या सहाय्याने बनविण्यात आलेल्या बोटीने जलविहार करण्याचा आनंद रिव्हर राफ्टींग या उपक्रमाद्वारे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी घेतला. उपप्राचार्या सोजी जेकब, क्रीडा शिक्षिका स्वाती ढेरंगे, सहायक शिक्षिका अनिता कोऱ्हाळे, सुधा नाईक, विद्या बांगर, सहायक शिक्षक अजित क्षीरसागर आणि रोहिदास गवारी यांनी व्यवस्था पहिली. सांगता समारंभात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्याक्षिके सादर करुन सर्वांची मने जिंकली.

यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गीत व नृत्ये सादर केली. मेरा मुल्क मेरा देश, ए मेरे वतन के लोगो, ये देश है वीर जवानोंका ही गीते संदीप मनुजा व महेश देशपांडे यांनी गायली. सांगता समारंभ व प्रमाणपत्र वाटप राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, संदीप मनुजा यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.