नार्ड स्ट्रीम पाईपलाईनवरून युरोपीय देशांमध्ये मतभेद

मुकरान : रशियाला जर्मनीशी जोडणाऱ्या नार्ड स्ट्रीम 2 गॅस पाईपलाईनवरून युरोपीय देशांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. रशियाकडून स्टील आणि काँक्रीटने निर्मित एक गॅस पाईपलाईन बाल्टिक समुद्राखालून जाणार आहे, या पाईपलाईनद्वारे युरोपीय देशांना नैसर्गिक वायूचा पुरवठा होणार आहे. ही पाईपलाईन 36 मीटर लांब आणि 24 टन वजनी पाईप जोडून तयार केली जात असून याची एकूण लांबी 800 मैल असणार आहे.

मॉस्कोला या पाईपलाईनद्वारे युरोपीय देशांमध्ये नवे वायू खरेदीदार मिळणार असल्याने रशियन अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होऊ शकतो. तर रशियन वायू खरेदीवरून युरोपीय देशांमध्ये मतभेद आहेत. या पाईपलाईनवरून युरोपीय देशांमध्ये विचारविनिमय सुरू असून 12 अब्ज डॉलर्सच्या खर्चाच्या या प्रकल्पाबद्दलचा वाद वाढत चालला आहे. या प्रकरणावरून जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणाऱ्या चर्चेदरम्यान जोरदार वाद-प्रतिवाद होण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)