नारायणगाव पोलिसांकडून पूरग्रस्तांसाठी मदत

नारायणगाव -सांगली व कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी जीवनावश्‍यक वस्तू, शालेय साहित्य व रोख रक्‍कम अशी 5 लाखांहून अधिक मदत केली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली आहे.
नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सांगली व कोल्हापुर पूरग्रस्तांसाठी 25 हजार रोख दिले. हद्दीतील विविध गावातील सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायीक आदींनी आर्थिक मदतीसाठी 1 लाख 35 हजार चेकने दिले व 25 हजार रुपये रोख असे 1 लाख 60 हजार आर्थिक मदत पोलिसांच्या वतीने देण्यात आली. पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल यांच्या वतीने एक हात मदतीचा या हेतूने कोल्हापूर येथील चिखली गावासाठी 15 टन धान्य, नवीन कपडे, चादरी, किराणा, राजेंद्र चासकर यांच्याकडून 2 ट्रक कडबा, असे जिवनावश्‍यक वस्तु चे दोन ट्रॅक साहित्य भरून काल दि 27 कोल्हापूरकडे रवाना केले. उद्योजक दिलीप कोठारी व अविनाश डावखर यांनी जिवनावश्‍यक वस्तुच्या नारायणगाव ते कोल्हापूर वाहतुकीसाठी दोन ट्रक दिले. तसेच पूरग्रस्तांना शालेय साहित्य गणपती मंडळाकडून जमा करुन मदत करण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.