नारायणगावात वर्षभरात साडेतीन कोटींची विकासकामे

सरपंच योगेश पाटे यांचा दावा ः अनधिकृत सोसायट्यांच्या सुविधा बंद करणार

नारायणगाव-नारायणगाव जनतेने विश्वास टाकून निवडून दिल्याने गावातील सामाजिक, आरोग्य समस्या व विकास कामाच्या माध्यमातून आपले गाव समृद्ध, सुंदर आणि हरित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून एक वर्षात 3 कोटी 48 लाखांची विकासकामे केली असल्याची माहिती नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
नारायणगाव ग्रामपंचायतीच्या एक वर्षातील विविध विकासकामे व उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज (शनिवारी) नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच संतोष दांगट, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आत्तार, विजय वाव्हळ, गणेश पाटे, राजेश बाप्ते, रामदास अभंग, संतोष पाटे, ज्योती दिवटे, सारिका डेरे, सुप्रिया खैरे, पुष्पा आहेर, संगीता खैरे, ग्राम विकास आधिकारी नितीन नाईकडे, सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते. मागील वर्षी 23 फेब्रुवारीला सरपंच योगेश पाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज 23 फेब्रुवारीपर्यंत पेव्हर ब्लॉक, कॉंक्रीटीकरण, शौचालय, बंदिस्त गटार, पाइपलाइन, नवीन अंगणवाडी, खडीकरण, शेड, संरक्षक भिंत, पाण्याच्या टाक्‍या, रस्ता खडीकरण, मोकाट डुकरांचा बंदोबस्त, जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक महोत्सव, स्व. साबीर भाई शेख ठिबक सिंचन योजना, प्लॅस्टिक बंदी मोहीम, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर स्मारक पाठपुरावा, हरित नारायणगाव होण्यासाठी 10 हजार झाडे 5 वर्षात लावणार आहे. आदी 3 कोटी 48 लाख 71 हजार 829 रुपयांची विकास कामे या कालावधीत सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने केली असून या पुढील काळात गॅस शववाहिनी, घनकचरा व्यवस्थापन, 15 लाख लिटर पाण्याची गरज ओळखून वटर स्ट्रीटमेन्ट प्रोजेक्‍ट राबविणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ओला व सुका कचरा विभाजन करून नियोजन करणार आहेत. नारायणगावात 132 सोसायट्या अनधिकृत आहेत. अनेक सोसयट्यानी ग्रामपंचायतीचे पाणी, लाईट, लाईन आदी सुविधा घेतल्या असून महसूल जमा करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने 1 एप्रिलपासून त्यांना सुविधा बंद करण्यात येईल. तसेच अतिक्रमण करण्यावर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी पाटे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.