नारायणगावमध्ये व्दारकामाईत गुरूपोर्णिमा

नारायणगाव- माणसातली सकारात्मक प्रवृत्ती वाढली की गुरूची भेट होते आणि गुरूवर श्रध्दा ठेवून आयुष्याचे राहटगाडगे चालवले की परमेश्वराची भेट आपओप घडते. वारकरी जसे ज्ञानेश्वर माऊलीकडे आळंदीला जातात, माऊलीला गुरू मानतात, तीच माऊली पढंरपूरच्या विठोबाचे दर्शन वारीच्या माध्यमातून घडवून आणते, असे श्रध्देने वागून आणि सबुरी ठेवून काम केले तर शिर्डीचे साई हाकेला ओ देतात, गुरूची महती अशी जाणण्यासाठी गुरुपौर्णिमेचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे, आसे प्रतिपादन हभप सुरेखा शिंदे यांनी केले. नारायणगाव-वारूळवाडी येथील साई मंदिरात गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी हभप सुरेखा शिंदे यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अश्विनी बोऱ्हाडे आणि संगीता मुंढे यांनी ग्रंथाचे पूजन कले. साई मंदिरातील द्वारकामाईमधील गुरूपौर्णिमेचे हे 10 वे वर्ष होते. उत्सवादरम्यान मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली होती.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)