नायजेरियामध्ये बोको हरामचे 16 दहशतवादी ठार

मैदुगिरी (नायजेरिया) – नायजेरियामध्ये सैनिकांनी बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या 11 जणांना ठार केल्याचा दावा सैन्याच्यावतीने करण्यात आला आहे. उत्तर बोर्नो राज्यामधील एका हल्ल्यादरम्यान झालेल्या चकमकीमध्ये हे दहशतवादी मारले गेले, असे नायजेरियातील लष्कराने सांगितले.

बोको हरामच्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी तीन वाहनांमधून मोनगुनो गावातल्या माइरारी भागात हल्ला केला होता. या दहशतवाद्यांनी गन ट्रक सारखी अवजड चिलखती वाहनेही आणली होती. यावेळी सैनिकांनी आणि लढाऊ विमानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये 16 दहशतवादी मारले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी झालेल्या चकमकीनंतर लष्कराने दहशतवाद्यांकडील गन ट्रक आणि दारुगोळाही ताब्यात घेतला, असे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. एक सैनिक आणि चार नागरिक हे गोळीबारादरम्यान जखमी झाले. या भागात लष्कराची अधिक कुमक पाठवण्यात आली आहे. गेल्या 9 वर्षात नायजेरियामध्ये बोको हरामच्या हल्ल्यामध्ये 20 हजार नागरिक मरण पावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)