नायगाव येथे “पर्यावरण संवर्धनाची राखी’

वृक्षलागवड : गतवर्षी लावलेल्या झाडांना बांधल्या राख्या

नाणे मावळ – मावळ तालुका युवा एकता मंच व निसर्गराजा या सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून कामशेत जवळील किनारा वृद्धाश्रमात वृक्ष लागवड करण्यात आली. याशिवाय गतवर्षी संस्थेने लावलेल्या झाडांना राखी बांधून अनोखी रक्षाबंधन साजरा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संस्थेचे सचिव कुणाल ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून संस्थेच्या प्रत्येक कार्याची माहिती दिली. तालुक्‍यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध राजकीय पक्षातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक वसा हाती घेतला आहे.

मावळ युवा एकता मंचचे तरुण करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद असल्याचे मत देवराईचे संस्थापक सुकन बाफना यांनी व्यक्‍त केले. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे असते. वृक्षारोपणाबरोबरच त्या वृक्षांच्या संवर्धनाचे पर्यावरणभिमूख कार्य सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेचा मी सक्रिय घटक आल्याचा मला अभिमान आहे, असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी व्यक्‍त केले. या वेळी आंदर मावळ भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संपत शेटे, वृद्धाश्रमच्या संचालिका प्रीती वैद्य, निसर्ग राजा ग्रुपचे राहुल घोलप, मंचचे अध्यक्ष विलास गायकवाड, सचिन भांडे, अनिल सातकर, नरेंद्र ओव्हाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले. रोहित तिकोणे यांनी आभार मानले.

निसर्गराजा ग्रुपचा अनोखा उपक्रम…
गेली 10 वर्षे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. निसर्गराजा ग्रुप मधील सदस्य उन्हाळ्यात विविध फळांच्या बिया गोळा करून झाडांची रोप तयार करतात. तिच रोप पावसाळ्यात लावतात आणि त्यांचे संवर्धन करण्याचे काम युवक एकता मंचचे कुणाल ओव्हाळ आणि त्यांचे सहकारी मित्र परिवार करीत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)