नायगाव येथील शाळेत वृक्षारोपण

नायगाव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे राजुरी आणि वाळुंज केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्‌घाटन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. दुसऱ्या सत्रात पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते यांनी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. यावेळी डी.पी. रोकडे, बाळासाहेब कड, राजुरी आणि वाळुंज केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कोलते, मुख्याध्यापक नंदकुमार कड, सुनिता कुंजीर, रविंद्र पाटोळे, यशवंत कड, मोहन खळदकर, रेखा बोरावके, मंदाकिनी कड, गणेश चव्हाण, दादा बोरावके, गणेश खेसे, रायचंद खेसे, सुदर्शन चौंडकर, महेश शेंडगे आदि उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)