नायगाव-माळशिरस येथील तलावाचे जलपूजन

नायगाव – पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील नायगाव व माळशिरस येथील तलाव भरला असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. नुकतेच महिंद्र खेसे, किशोर खळदकर, प्रवीण बनकर, नारायण चौंडकर यांनी तलावातील पाण्याचे पूजन केले. ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुरंदर उपसा सिंचन योजनातून पाणी घेतले आहे.
दरवर्षी पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागात कमी प्रमाणात पाऊस पडत असून यंदा पावसाने चांगलीच दडी मारली आहे. पेरणी केलेली पीके जळू लागली होती. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटूनही तालुक्‍यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तसेच पिण्याच्या पाण्यासह, जनावरांच्या चाऱ्याचा ही प्रश्न निर्माण झाला होता. बंधाऱ्यात सोडलेल्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. यामुळे शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात नारायण खेसे, बाबासाहेब चौंडकर, विलास खेसे, दिलीप मोरे, प्रभाकर खळदकर, किशोर खळदकर, मोहन बनकर, तात्या खळदकर, महेंद्र खेसे, दादा खेसे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)