खळद- पुरंदर तालुका नाभिक संघटना संकल्पित संपूर्ण तालुक्यातील वाडी-वस्त्यावर विखुरलेल्या नाभिक समाजाची जनगणना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील खळद गावातून श्री संत सेना सेवा संघाच्या वतीने जनगणना कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे नेते मुन्ना शिंदे, नितीन राऊत, संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल मगर, कार्याध्यक्ष भारत मोरे, सचिव तुकाराम भागवत, उपाध्यक्ष सागर इभाड, गणेश बंड, मल्हार राऊत, सुशील राऊत समवेत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ads