नाफेडने शेतकऱ्यांसाठी पारदर्शक कार्यक्रम आखावेत

नवी दिल्ली – नाफेड व्यवस्थापनाने बळीराजाच्या कल्याणासाठीचे काम सुरू ठेवतानाच खरेदीसाठी पारदर्शी यंत्रणा राबवावी, असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी नवी दिल्लीत नाफेडच्या कार्यक्रमात बोलतांना केले.

अलीकडच्या काळापर्यंत आर्थिक गर्तेत आणि कर्जाच्या खाईत बुडालेल्या नाफेडने 2017-18 या आर्थिक वर्षात विक्रमी नफ्याची नोंद केली. यामुळे महासंघाने कर्जदात्या बॅंकाना 478 कोटीच्या वन टाईम सेटलमेंटचा एक भाग म्हणून 220 कोटी रुपयांची तरतूद केली.

महासंघाच्या मदतीसाठी अनेक प्रयत्न आणि योजना आखण्यात आल्या. 27 जानेवारी 2016 ला आणलेली वन टाईम सेटलमेंट उपयुक्त ठरली. यासाठी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्र सरकारचे विविध विभाग, कर्जदात्या बॅंका आणि राज्य सरकारने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवी दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)