नाणे मावळात ग्रामपंचायत कर वसुली सरासरी 61 टक्‍के

कामशेत (वार्ताहर) – ग्रामपंचायतीस कराद्वारे मिळणारे उत्पन्न यावर गावांचा विकास अवलंबून असतो. नाणे मावळातील बऱ्याच ग्रामपंचायती लहान असल्याने त्याचे उत्पन्न कमी आहे. या भागात कारखाने, व्यवसाय, गृह प्रकल्प नाही, त्यामुळे उत्पनात वाढ नाही. गावाचा विकास करायचे असेल, तर गावचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी पाणीपट्टी व घरपट्टी वसूल झाली पाहिजे.

नाणे मावळात सन 2017-18 सरासरी 61 टक्‍के फक्‍त वसुली झाली. सर्वात कमी वसुली उकसान 36 टक्‍के आणि सांगिसे 37 टक्‍के सर्वात जास्त वसुली मुंढावरे 95 टक्‍के, शिरदे 54 टक्‍के, साई 71 टक्‍के, नाणे 71 टक्‍के, कांब्रेनामा 60 टक्‍के, करंजगाव 52 टक्‍के, गोवित्री 50 टक्‍के, खांडशी 88 टक्‍के वसुली झाली आहे.

काही मोजक्‍या ग्रामपंचायतीचे 100 टक्‍के कर वसुली करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर काही ग्रामपंचायतीमध्ये उदासिनता दिसत आहे. सामान्य लोक वेळेवर कर भरतात; पण धनदांडगे श्रीमंत लोक ग्रामपंचायतीचे थकबाकीदार असल्याचे दिसते. तसेच उकसान व सांगिसे सारख्या ग्रामपंचायतीमध्ये करवसुलीबाबत ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या समन्वयाचा अभाव दिसतो. त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांची कर वसुली कमी आहे. जोपर्यंत 100 टक्‍के कर वसुली होत नाही, तोपर्यंत गावचा विकासास गती प्राप्त होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)