नाणेकरवाडीतील मंदिराचे काम लवकरच पूर्ण करणार- नाणेकर

वाकी-लग्न सोहळा व अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या नाणेकरवाडीतील देवक मंदिराचे आकर्षक बांधकाम लवकरच पूर्ण करू, अशी ग्वाही नाणेकरवाडीचे सरपंच सिद्धेश्वर नाणेकर यांनी दिली.
नाणेकरवाडी येथे नव्याने देवक मंदिराचे काम हाती घेण्यात आले असून, त्या देवक मंदिराचे सरपंच सिद्धेश्‍वर नाणेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस. एस. वांगसकर, मावळते सरपंच शशिकांत नाणेकर, उपसरपंच गंगुबाई जाधव, सदस्य संदीप नाणेकर, राहुल नाणेकर, सतीश विटकर, राजेंद्र नाणेकर, सुनील नाणेकर, शरद नाणेकर, दिपाली नाणेकर, प्रतिभा जाधव, सुनिता कुसाळकर, अर्चना नाणेकर, सुनिता जाधव, सुदाम जाधव, राघु नाणेकर, रवि नाणेकर, बाळासाहेब नाणेकर, प्रणिता जांभळे, शैलेश नाणेकर, त्रिदेव नाणेकर, राहुल फडके, अतुल नाणेकर, संतोष नाणेकर, सोमनाथ नाणेकर आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्टीत मान्यवर, नाणेकरवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
सिद्धेश्वर नाणेकर म्हणाले की, या भागात राहणाऱ्या काही नागरिकांना देवक मंदिर नेमके कोठे आहे, हे सापडत नव्हते. त्याकरिता नाणेकरवाडी येथे अद्ययावत असे देवक मंदिर उभारून त्याचे आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे. वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती करण्या बरोबरच मुलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यात कुठलीही हयगय करणार नाही, असे त्यांनी नमूद केले. राहुल नाणेकर व शशिकांत नाणेकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक दिपाली नाणेकर, सूत्रसंचालन गंगुबाई जाधव तर शरद नाणेकर यांनी
आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)