नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केली नाही – मुख्यमंत्री

मुंबई : नाणार प्रकल्पावरून सध्या राज्यात राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.’अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.’ असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. त्यामुळे सरकार विरोधानंतरही नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे दिसत येत आहे.

‘उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द केली आहे. त्यामुळे आता नाणार प्रकल्प होणार नाही.’ असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाणारमधील सभेत केला होता. मात्र, अशी कोणतीही अधिसूचना अद्याप सरकारने रद्द केलेली नाही. असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ‘सुभाष देसाईंनी अधिसूचना रद्द करण्याबाबतचे मत व्यक्त केले पण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. सरकारचे मत नाही. अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. तो अधिकार मंत्र्यांना नाही. अधिसूचना रद्द करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव समितीसमोर अद्याप आलेला नाही. त्यामुळे राज्याच्या आणि कोकणाच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. सरकारने अधिसूचना रद्द केलेली नाही.’असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)