नाणारमधील ग्रामस्थांना राहुल गांधींचा पाठींबा

नवी दिल्ली –  नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. ग्रामस्थांच्या प्रखर संघर्षाबद्दल सहानुभूती व्यक्त करीत सुपीक व भरपूर उत्पन्न देणाऱ्या जमिनी या प्रकल्पासाठी घेण्यास त्यांनी विरोध दर्शविला.

नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस  मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत दिल्ली येथे शनिवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर सदस्यांनी याबद्दलची पाश्र्वभूमी स्पष्ट करताना या गावात आंबे, काजू, नारळ, सुपारी, साग, बांबू  इत्यादींची  जवळपास सहा कोटी झाडे असून सभोवती पश्चिम घाटाचा भागदेखील येत असल्याचे सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचा आदेश दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)