नागरी वस्तीतल्या कालव्यांची पहाणी होणार

नितीन बानुगडे-पाटील
सातारा (प्रतिनिधी) – कृष्णा खोरे महामंडळाच्या क्षेत्रातील तसेच या क्षेत्रातील नागरी वस्तीतून जाणाऱ्या सगळ्या कालव्यांची पहाणी केली जाणार आहे. त्याचे अहवाल तातडीने घेतले जातील.तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर येथील नागरी वस्तीतील कालव्यांची तपासणी केली जाईल. त्याचे ही अहवला मागवले असल्याची माहिती कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिले.
पुणे येथे खडकवासला कालव्याची भिंत फुटल्या नंतर नागरी वस्तीत झालेल्या हाहाकाराची तसेच नागरी वस्तीतून जाणाऱ्या कालव्यांची पहाणी केल्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खडकवासला कालवा दुर्घटनेचा अहवालही मागवला. त्या नंतर त्यांनी दै.प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना ही माहिती दिली.
बनुगडे-पाटील पुढे म्हणाले, दिवस भरात खडकवासला धरणाच्या 30 किलोमिटर कालव्याची मी पहाणी केली. हा कालवा बारा महिने वाहत आहे. पुणे शहराला पिण्याचे पाणी ही याच कालव्यातून पुरवले जाते. सहाजिकच त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या पन्नास वर्षात अवधी मिळाला नाही. या कालव्याच्या पायाची दुरुस्ती तसेच देखभाल करता आली नाही. पुणे महापालिकेला दोन वर्षांचा कालावधी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करुन कालवा दुरुस्तीसाठी दिला होता मात्र अडिच वर्षे झाली तरी ही दुरुस्ती झाली नाही.तसेच दोन आर्वर्तनांच्या मधे वेळ मिळून पाटबंधारे खात्याला दुरुस्ती , देखभालीसाठी जो वेळ मिळाला पाहिजे तो ही मिळाला नाही. त्याचा परिणाम म्हणजे काल घडलेली दुर्घटना आहे.
बानुगडे-पाटील पुढे म्हणाले, दिवसभर बैठक तसेच फुरसुंगी ते पुणे असा प्रवास आज करून हे पाणी भुयारी मार्गाने नेण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला. जर भुयारी जलमार्ग तयार करता आला तर सध्याच्या कालव्याच्या मार्गाने एक्‍सप्रेस वे करता येईल आणि पाण्या बरोबर वाहतूक व्यवस्था ही होऊ शकेल.बारा महिने सतत कालव्यातून पाणी वाहत असल्याने तळ दुरुस्ती व देखभाल करता आली नाही याचा विचार करून आता सातारा,सांगली, कोल्हापूर तसेच कृष्णा खोरे क्षेत्रातील विशेषतः नागरी वस्तीतील कालव्यांची पहाणी आणि ऑडिट केले जाणार आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी या अहवालांवर लवकर कृती करण्याचे नियोजन ही केले जाणार असल्याचे नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगीतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)