नागठाणे परिसरातील गावांचा जिल्हा बंदला प्रतिसाद

नागठाणे येथे बंद असलेली दुकाने

नागठाणे, दि. 25 (प्रतिनिधी) – मराठा आरक्षण मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या सातारा जिल्हा बंदला बुधवारी नागठाणेसह परिसरातील गावामधून उस्फूर्त पाठिंबा मिळाला. संपूर्ण नागठाणेसह परिसरातील गावांमधून कडकडीत बंद पाळून औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा बांधव काकासाहेब शिंदे यांस नागठाणेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे या आंदोलकाने राज्य शासनाच्या निषेधार्थ गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्यानंतर आज सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्याला नागठाणेसह बोरगाव, अपशिंगे(मि.), देशमुखनगर, अतीत, काशीळ, वेणेगाव, निसराळे आदी गावांमधून शंभर टक्के बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागठाणे येथील मराठा युवकांनी एकत्र येवून काकासाहेब शिंदे यास श्रद्धांजली अर्पण केली.
बंदच्या पार्श्वभूमिवर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील गावांमधून तसेच महामार्गावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)