नागठाणे कॉलेजचे कामेरी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

कामेरी : श्रमसंस्कार शिबिरात श्रमदान करताना नागठाणे कॉलेजचे विद्यार्थ्यी

नागठाणे, दि. 31 (प्रतिनिधी)- येथील आर्टस ऍण्ड कॉमर्स कॉलेजचे विशेष श्रमसंस्कार शिबीर कामेरी येथे नुकतेच विविध उपक्रमाने संपन्न झाले. शिबिराचा समारोप मा. प्रा. डॉ. महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थतीत तर कृषिभूषण मनोहर साळुंखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आजच्या तरुणाईला श्रमाचा संस्कार महत्वपूर्ण असून हा संस्कार स्वयंशिस्तीतून विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून घेत असतो, असे डॉ. महेश गायकवाड म्हणाले. कृषिभूषण श्री मनोहर साळुंखे म्हणाले की, युवकांनी शेती व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे, योग्य नियोजन व अभ्यासपूर्ण शेती केली तर नक्कीच शेतीसारखा फायदेशीर व्यवसाय नाही. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष शेळके होते. या शिबिराने आम्हाला विकासाकडे नेण्याची दिशा दिली असे सरपंच श्री सुंदर घाडगे म्हणाले. समारोप समारंभाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा संदीप लोखंडे, आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय जायभाये तर सूत्रसंचालन प्रा. गणेश गभाले यांनी केले. स्वयंसेवक अक्षय कदम याने मनोगत व्यक्त केले. या सात दिवसाच्या शिबिरात सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. संतोष चौधरी, यांचे व्याख्यान झाले. त्याचबरोबर मारुतीराव थोरात यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व प्रात्यक्षिके सादर झाली. कामेरी गावाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय भौगोलिक, ऐतिहासिक सर्वेक्षण केल्या गेले. तर स्वयंसेवक श्री दिपक सकपाळ याच्या भावगीताने सर्वाना थंडीतही चिंब केले. महिला मेळावा सौ. मेघा चक्के माजी सहायक, बालविकास अधिकारी यांच्या उपस्थतीत पार पडला. या मेळाव्यास महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. हळदी कुंकुचा समारंभ झाल्यावर महिलांनी उखाणे घेऊन रंगत आणली होती. वनक्षेत्रपाल, फिरते पथक, सातारा जिल्हा संदीप गवारे यांचे वनसंरक्षण या विषयावर मार्गदर्शन झाले. लायन्स क्‍लब, सातारा यांच्यावतीने मानवी आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मेवाटप केल्या गेले. शेतकरी मेळाव्याचे आयोजन मा.गणेश देशमुख चेअरमन, शंकरराव देशमुख उद्योग समूह यांच्या उपस्थितीत पार पडले. अमोल जाधव हे यावेळी अध्यक्ष होते. सदर शिबिरात व्यक्तिमत्व विकास, कृषीविषयक मार्गदर्शन, अंधश्रद्धा निर्मुलन, ग्रामीण विकास, शासकीय योजना याविषयी माहिती चर्चासत्र, वादविवाद, परिसंवाद, सुरसंगम इ.उपक्रम झाले. परिवर्तन संस्था सातारा यांच्या वतीने मुलांवरील ताण तणाव यावर पथनाट्य सादर केल्या गेले. समाजसेवक श्री मधुअण्णा खुळे, श्री घनश्‍याम ताटे, श्री बाळासाहेब पवार यांनी सदिच्छा भेट दिल्या. कामेरी गावात मंदिर स्वच्छता,स्मशानभूमी स्वच्छता, रोपांना आळे व गावातील नाल्यावर दगडी पिचिंग करण्यात आले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे येथील राष्ट्रीय सेवा योजना समितीतील कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय जायभाये, कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप लोखंडे, सदस्य प्रा. जयमाला उथळे, प्रा. गणेश गभाले,प्रा. भालचंद्र बीचीतकर, प्रा. रणधीर शिलेवंत, प्रा. सागर चव्हाण, प्रा. प्रशांत कांबळे, शोभा कुंभार, प्रशांत सावंत तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी,कामेरी गावातील सरपंच सुंदर घाडगे, उपसरपंच नानासाहेब घाडगे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, गणेश मंडळ, दुर्गादेवी मंडळ,महिला बचत गट, पारायण मंडळ इ. परिश्रम घेतले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here