नाकेबंदीदरम्यान तीन लाख रुपये जप्त

शिरुर- शिरुरला नाकाबंदीदरम्यान तपासणी करत असताना भरारी पथकाने तीन लाख रुपये जप्त केले आहेत. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदिप बाळाराम जाधव (रा. त्रिवेणी सेवा मंडळ, मालाड), नागेंद्र मिश्रा (रा.नागपूर) व समसेत मुसागड (रा.अंधेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.तर संतोष निवृत्ती गदादे यांनी फिर्याद दिली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी पथक सोमवारी (दि. 16) मध्यरात्री अडीचच्या सुमारास शिरुरच्या सतरा कमान पुलाजवळ नाकाबंदी करुन वाहने तपासणी करत असताना एका कार (एमएच 31 डिके 8779)ची तपासणी करत असताना त्यामध्ये रोख 3 लाख व राजकीय पक्षाचे फ्लेक्‍स, बॅनर मिळून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.