नांदे येथे लुपिन फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

पिरंगुट- नांदे (ता. मुळशी) येथे लुपिन फाउंडेशनच्या वतीने अंगणवाडी तसेच पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. तसेच इयत्ता पहिली ते नववीपर्यंत प्रत्येक वर्गासाठी ई-लार्निग सॉफ्टवेअर देण्यात आले. ही पुस्तके मुलांमध्ये लिखाण आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी. चित्रकला, अंक, अल्फाबेट, गोष्टी, कविता आणि इतर कौशल्य विकास पुस्तके एकूण 292 विद्यार्थ्याना याचे वाटप करण्यात आले.
यावेळी लुपिन फाऊंडेशनचे अरनबी मारजीत, प्रमोद कुलकर्णी, व्यंकटेश शेटे, पल्लवी पारधी, सरपंच प्रशांत रानवडे, माजी सरपंच हनुमंत सुर्वे, माजी सरपंच विठ्ठल रानवडे, शाळा समितीचे अध्यक्ष सचिन डांगे, मारुती रानवडे, विजय डांगे, अजय करंजावणे आदी मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सरपंच प्रशांत रानवडे यांनी शाळेस सोलर सिस्टिम आणि विद्युत प्रश्न सोडविल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे तसेच ग्रामपंचायतचे विशेष आभार मानण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)