नांदूर ओढ्यालगत कचऱ्याचे ढीग

नांदुर- नांदुर (ता. दौंड) या ठिकाणी ओढ्यालगत कचऱ्याचे ढिगारे वाढलेले असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नांदुर रोड लगत दोन्ही ओढ्यांत कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्यामध्ये मेलेल्या कोंबड्या, फाटलेली कपडे, पालेभाज्या, मेलेली जनावरे, कापलेले केस, खाण्याचे पदार्थ टाकण्यात येत आहेत. त्यामुळे या ओढ्याच्या पाण्याला दुर्गंधी तर येत आहेच; पण ते पाणी गावालगतच्या विहिरीत येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पाण्यापासून रोगराई वाढण्याची शक्‍यत असून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी चर्चा नांदुरमधील ग्रामस्थ करीत आहे. या ओढ्यात रात्रीच्या वेळी कचरा टाकला जातो, तसेच या भागात औद्योगिक वसाहत असून नागरिकांची रहदारीचे प्रमाण वाढल्यामुळे कचऱ्याची समस्याही वाढू लागली आहे

  • यापुढे ओढ्यालगत किंवा ओढ्यात कचरा टाकताना दिसल्यास दंडात्मक करवाई करण्यात येईल. सर्वांनी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
    लता थोरात, सरपंच, नांदूर

Leave A Reply

Your email address will not be published.