नांदूरफाटा येथेकारवर ट्रक पडून एक ठार 

उसानेभरलेल्या ट्रकनेकारचा चक्काचूर
श्रीरामपूर – श्रीरामपूर – संगमनेर रस्त्यावर नांदूर फाटा येथेकारवर उसानेभरलेला ट्रक पडल्यानेकारचालकाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी 1 च्या सुमारास हा अपघात झाला.
अन्सार महंमद कासम पटेल (वय 54, रा. वार्ड क्र. 7) असेमृताचे नाव आहे. पटेल मुंबई येथेनगररचना विभागात कार्यरत होते. रविवारी दुपारी ते घरी जाण्यास निघाले. नांदूर फाट्याजवळ संगमनेरच्या दिशेनेजाणारा उसानेभरलेला ट्रक (क्र. एमएच – 28 – बी- 6535) त्यांच्या कारवर पलटी झाला. यात पटेल यांची कार चक्काचूर झाली. अपघाताचेवृत्त समजताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पटेल यांना तात्काळ श्रीरामपुरातील संजीवन रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शहरातील व्यावसायिक अल्तमश पटेल यांचेते वडील होत. त्यांच्यावर हसनापूर (ता. राहाता) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)