नांदुर येथील विहिरीत आढळली बेवारस मोटारसायकल

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील नांदूर येथे शेतकरी संपत खंडू भालेराव यांच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना हिरो कंपनीची बेवारस मोटारसायकल आढळून आली आहे, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र हिले यांनी दिली आहे.
गावचे पोलीस पाटील यांनी विहिरीत मोटारसायकल आढळल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याला कळविले आहे. पोलीस कर्मचारी रामदास तनपुरे यांनी घटनास्थळी जाऊन मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. ज्या कोणाची मोटारसायकल बेपत्ता झाली असेल, त्यांनी मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.